आठशे खिडक्या नऊशे दारं' मालिकेची प्रेस कॉन्फरन्स घरी बसून पडली पार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


 


 


लॉकडाऊनमध्ये सुरू होणारी ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. मालिकेची व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स शुक्रवार, दिनांक 15 मेला पार पडली.


 


घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी बनवण्यात आलेल्या या मालिकेची प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घरी बसूनच झाली. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात कोणी घरा बाहेर पडू शकत नसल्याने सर्वच जण खिडकीतून जग बघत आहेत त्याचप्रमाणे या व्हर्चुअल खिडक्यांमधून आज सर्व पत्रकार, कलाकार आणि मालिकेच्या इतर टीमची भेट झाली.  


 


लॉकडाऊनच्या काळात सुरू होणारी ही पहिली नवी मालिका आहे आणि सोनी मराठी वहिनीनं उचललेलं हे अतिशय धाडसी पाऊल असल्याने सर्वत्रच त्याच कौतुक केलं जात आहे. या मालिकेत एकूण 16 कलाकार असून ते आपापल्या घरूनच या मालिकेचं चित्रीकरण करणार आहेत.


 


सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले, लेखिका विभावरी देशपांडे आणि कलाकार लीना भागवत, मंगेश कदम, समीर चौघुले आणि थेट लंडनवरून सखी गोखले व सुव्रत जोशी या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते. मालिकेचं चित्रीकरण घरून करण्याचे अनुभव ते करताना उदभवणाऱ्या समस्या आणि त्यासाठी केलेले जुगाड अशा सर्वच विषयांवर या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. पत्रकारांकडूनसुद्धा या आगळ्या वेगळ्या मालिकेचं आणि झालेल्या पहिल्या वाहिल्या व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्सचं कौतुक झालं. 


 


त्याचप्रमाणे प्रेस कॉन्फरन्समध्ये या मालिकेचे तीनही प्रोमोज दाखवण्यात आले आणि मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्येचं एक्सक्लुसिव्ह रिलीज करण्यात आलं.


 


कलाविश्वात अशी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स पहिल्यांदाच घेण्यात आली आणि घरून शूट होणाऱ्या मालिकेप्रमाणेच या मालिकेची व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्ससुद्धा चर्चेचा विषय ठरली.


 


पाहायला विसरू नका लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी बनवलेली ही नवी विनोदी मालिका 'आठशे खिडक्या नऊशे दारं' १८ मेपासून सोमवार-मंगळवार रात्री १० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर ही नवीन पान मालिका सुरू झाली आहे. 


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन