काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानपरिषदेकरिता पुणे शहरातून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


                                  आरिफ काचवाला - सदस्य - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी


 


पुणे शहरातील मुस्लिम काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्व क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळावे . काँग्रेस पक्षामार्फत लोकसभा , विधानसभा , विधानपरिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था विविध महामंडळे व पक्षीय पातळीवर सर्व क्षेत्रात योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे .


 


पुणे शहरातील मुस्लिम काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी यांची अनोपचारिक तातडीची बैठक संपन्न झाली . या बैठकीत ठराव समंत करण्यात आले . व त्याचे निवेदन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व केंद्रीय नेर्तृत्वाला देण्यात आले .


 


नुकत्याच होणाऱ्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी पुणे शहरातून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे . पुणे शहर काँग्रेस कमिटी , प्रदेश काँग्रेस कमिटी , केंद्रीय कमिटीवर मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे . महाआघाडी सरकारतर्फे निवडण्यात येणाऱ्या विविध महामंडळे , राज्यस्तरीय समित्या , जिल्हास्तरीय समित्या यामध्ये होणाऱ्या नेमणुकांमध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे . गेली ३३ वर्षापासून मुस्लिम समाजातून केंद्र व राज्यस्तरावर योग्य नेर्तृत्व नसल्याने यंदा पुणे शहरातून काँग्रेस पक्षाकडून नेर्तृत्व निर्माण करण्याकरिता विधानपरिषद सदस्य करिता मागणी करण्यात येत आहे . तर पश्चिम महाराष्ट्रामधील प्रत्येक तालुका , जिल्हा स्तरावर काँग्रेस पक्षातील मुस्लिम पदाधिकारी यांनीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रकरीता पुणे शहरातून विधान परिषद सदस्य नियुक्त करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी मुस्लिम नेर्तृत्व देण्याकरिता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनासुद्धा पत्राद्वारे कळविले आहे .


 


या बैठकीस माजी नगरसेवक मुख्तार शेख , ऍड . शाहिद अखतर , आरीफ काचवाला , अमीन शेख , शफीउद्दीन शेख , ऍड. फैय्याज शेख , अल्ताफ सय्यद , असिफ शेख , सादिक लुकडे , हसन कुरेशी , समद शेख , मुन्ना काझी , अतिक रियाज वस्ताद , समीर शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते