सिंहगड रस्ता परिसरातील नभिक व्यवसायिकांना प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने स्वामी बॅग्ज निर्मित पिपीई किट प्रदान.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सिंहगड रस्ता परिसरातील नभिक व्यवसायिकांना प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने स्वामी बॅग्ज निर्मित पिपीई किट प्रदान.


 


पुणे :- करोना महामारीमुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गेली तीन महीने नभिक व्यवसायावर (केशकर्तन)सरकारने बंदी घातली होती.ती २८ जून पासून योग्य ती सुरक्षा खबरदारी घेवून सुरू करण्यास परवानगी दिली.त्या पार्श्वभूमीवर प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने सिंहगड रस्ता परिसरातील नाभीक व्यवसायिकांना व्यवसायिक व ग्राहक यांची सुरक्षा व्हावी यासाठी स्वामी बॅग्ज निर्मित मोफत पिपीई किट प्रदान केले.विठ्ठल मंदिर सिहगड रोड समोर झालेल्या या वाटप प्रसंगी आयोजक नगरसेवक प्रसन्न दादा जगताप,स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप,प्रमुख पाहुणे राजेशजी पांडे(संघटक सरचिटणीस भाजप पुणे शहर),सचिन मोरे(खडकवासला भाजप युवा अध्यक्ष),नितिन भूजबळ(अध्यक्ष खडकवासला),सूर्यकांत भोसले(अध्यक्ष पार्वती),किशोर कुलकर्णी,राहुल जोशी,सुरेश देशमुख,आदि मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व नाभीक व्यावसायिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना राजेश पांडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.व हा समाजोपयोगी उपक्रम असल्याचे संगितले.राहुल जगताप यांनी स्वामी बॅग्ज निर्मित पिपीई किट उत्तम दर्जाचे व लॅब टेस्टेड असल्याचे संगितले.  


 


छायाचित्र :किट वाटप करताना प्रसन्नदादा जगताप,राजेशजी पांडे,राहुल जगताप व अन्य