शेतकऱ्यांच्या रखडलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण करून,बळीराजाला कर्ज वाटप करण्यात यावे,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रति,


मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब


मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.


द्वारा:- मा.जिल्हाधिकारी,सातारा


 


यांस..


 


मा.महोदय,


छावा क्रांतीवीर सेनेचे संथापक अध्यक्ष


करण गायकर व केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली..


मी सागर भारत साळुंखे छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आपणास निवेदन असे की,


राज्यात कोरोनाचे संकट उभे असल्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांचे दोन लाखापर्येंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती.पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्जवाटप ठप्प आहे.


दोन लाखावरच्या कर्जासाठी ओटीएस लागू करू आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम देवू असे अर्थ संकल्पात जाहीर केले.प्रत्येक्षात या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही.


म्हणून पाऊस,खरीप हंगाम आणि शेतीचीे कामे थांबली नाहीत.त्यामुळे रखडलेल्या कर्ज माफी योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण करून बळीराजाला दिलासा द्यावा,अशी मागणी छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने,


मी सागर भारत साळुंखे, रोहित पंडित सुतार,विशाल डोंगरे,अक्षय खाडे, कृष्णत तुपे,सुजित लादे,सिद्राम कसकी,अजिंक्य कांबळे,सागर शिंदे आम्ही करीत आहोत.


राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे' या योजनेच्या बोजवारा उडालेला आहे.पीक कर्जाचे वाटप ठप्प झाले आहे.राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करणे गरजेचे आहे.


राज्यात अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.मजबुरीने व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागत आहे.चणा खराब होण्याची वेळ आली तरी खरेदी होत नाही.खरीप पिककर्ज नाही, कापसाचे,तुरीचे,चण्याचे पैसे मिळाले नाहीत.बियाणे,खत, मजुरीचा खर्च भागवायचा कसा? 


असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.दागिने गहाण ठेवून शेतकरी सावकाराकडे विनवणी करतो आहे.तरी शेतकऱ्यांच्या रखडलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण करून,बळीराजाला कर्ज वाटप करण्यात यावे,


अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आम्ही देत आहोत.