मा. मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी सोशल मिडियावर  अश्लील मजकूर लिहिण्या विरोधात कारवाई होणार 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


मा. मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी सोशल मिडियावर 


अश्लील मजकूर लिहिण्या विरोधात कारवाई होणार 


 


 


औसा : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील भाषेत मजकूर लिहिल्याबद्दल औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी तत्काळ गुन्हेगाराचा शोध घेवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.


 


संपुर्ण राज्यभर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात टिकेल असे अभ्यासपूर्ण मराठा आरक्षणचा पाठपुरावा केला यामुळे हे आरक्षण शक्य झाले असे आ. पवार यांनी म्हटले आहे.


 


याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे शनिवारी लागलेल्या राज्य सेवा परीक्षेत मराठा समाजातील १२७ विद्यार्थी वर्ग १, वर्ग २ चे अधिकारी झाले.


 


असे असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील भाषेत मजकूर लिहिल्या बद्दल औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यांनी दि. २१ जून रोजी रात्री याप्रकरणी औसा पोलिसात संबंधित मजकूर लिहिणाऱ्याबद्दल तक्रार दाखल केली असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.


 


यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, गटनेते सुनील उटगे, संतोष मुक्ता, भीमाशंकर मिटकरी, हणमंत कांबळे आदी उपस्थित होते