पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये 21 हजार 616 गरजूंना लाभ - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर पुणे दि.7 : - पुणे विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्रे असून सर्व सुरु असून 21 हजार 616 गरजूंनी लाभ घेतला आहे. 6 जून 2020 रोजी 21 हजार 616 (93.58%) थाळयांचे वाटप झालेले आहे. पुणे विभागामध्ये स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज सर्व दुकाने सुरूआहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरू झाले असून 97.53 टक्के धान्यवाटप झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे मे महिन्याचे नियमित मंजूर 65 हजार 537.50 मे टन असून आज अखेर 65 हजार 361.95 मे टन (99.73%) धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य वितरण 99.9 % आहे. याअंतर्गत एकूण 27.21 लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना 62 हजार 833 मे टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पुणे विभागासाठी माहे मे 2020 मोफत तांदळाचे मंजूर नियतन 62 हजार 997 मे टन असून आज अखेर त्यापैकी 61 हजार 846 मे टन (97.53%) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत माहे ए्रपिल ते जून महिन्यासाठी डाळ 28 एप्रिल 2020 रोजी शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत माहे एप्रिल,मे व जून साठी चणाडाळ व तूरडाळ या दोन्हींपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत मोफत वितरीत करावयाचेआहे. पुणे विभागासाठी 3 हजार 41 मे टन नियतन मंजूर झाले असून माहे मे महिन्याचे मोफत तांदळासोबत डाळ वाटप करण्यात येत आहे. आज अखेर 1 हजार 775 मे टन (58.37%) डाळ लाभार्थांना वितरीत करण्यात आली आहे. केशरी कार्डधारकांसाठी मे 2020 साठी 40 हजार 401 मे टन नियतन मंजूर झालेले आहे. त्यापैकी 40हजार 401 मे टन (100%) धान्याची उचल झालेली आहे व 30 हजार 205.16 मे टन (74.76%) धान्य वाटप आजतागायत झाले आहे. पुणे विभागासाठी माहे जून महिन्याकरीता 30 हजार 991.63 टन गहू व तांदूळाचे नियतन मंजूर आहे. त्यापैकी 15 हजार 978.53 मे टन (51.56 %) उचल केलेले आहे. त्यापैकी 2 हजार 665 .37 मे टन (9 %) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत माहे मे 2020 साठी 5 किलो मोफत तांदूळ वितरीत करावयाचे आहे. माहे मे करीता मंजूर नियतन 6 हजार 459.8 मे टन असून 5 हजार 314.8 मे टन ( 82.27 %) उचल झाली असून 994.39 मे टन (15.39%) तांदूळाचे वितरण झाले आहे. पुणे विभागात सर्वसाधारणपणे गहू,तांदूळ,खाद्यतेल, डाळी इ. जिवनावश्यक वस्तुंची आवक ही लॉकडाऊन पुर्वीच्या आवकच्या तुलनेत सद्यस्थितीत 90.00 % आहे. जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नाही. जिवनावश्यक वस्तु व औषधे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले. 0 0 0 0 0

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 पुणे दि.7 : - पुणे विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्रे असून सर्व सुरु असून 21 हजार 616 गरजूंनी लाभ घेतला आहे. 6 जून 2020 रोजी 21 हजार 616 (93.58%) थाळयांचे वाटप झालेले आहे.


               पुणे विभागामध्ये स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज सर्व दुकाने सुरूआहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरू झाले असून 97.53 टक्के धान्यवाटप झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


   पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे मे महिन्याचे नियमित मंजूर 65 हजार 537.50 मे टन असून आज अखेर 65 हजार 361.95 मे टन (99.73%) धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य वितरण 99.9 % आहे. याअंतर्गत एकूण 27.21 लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना 62 हजार 833 मे टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.


 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पुणे विभागासाठी माहे मे 2020 मोफत तांदळाचे मंजूर नियतन 62 हजार 997 मे टन असून आज अखेर त्यापैकी 61 हजार 846 मे टन (97.53%) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे.


 प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत माहे ए्रपिल ते जून महिन्यासाठी डाळ 28 एप्रिल 2020 रोजी शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत माहे एप्रिल,मे व जून साठी चणाडाळ व तूरडाळ या दोन्हींपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत मोफत वितरीत करावयाचेआहे. पुणे विभागासाठी 3 हजार 41 मे टन नियतन मंजूर झाले असून माहे मे महिन्याचे मोफत तांदळासोबत डाळ वाटप करण्यात येत आहे. आज अखेर 1 हजार 775 मे टन (58.37%) डाळ लाभार्थांना वितरीत करण्यात आली आहे.


                     केशरी कार्डधारकांसाठी मे 2020 साठी 40 हजार 401 मे टन नियतन मंजूर झालेले आहे. त्यापैकी 40हजार 401 मे टन (100%) धान्याची उचल झालेली आहे व 30 हजार 205.16 मे टन (74.76%) धान्य वाटप आजतागायत झाले आहे. पुणे विभागासाठी माहे जून महिन्याकरीता 30 हजार 991.63 टन गहू व तांदूळाचे नियतन मंजूर आहे. त्यापैकी 15 हजार 978.53 मे टन (51.56 %) उचल केलेले आहे. त्यापैकी 2 हजार 665 .37 मे टन (9 %) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे.


  केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत माहे मे 2020 साठी 5 किलो मोफत तांदूळ वितरीत करावयाचे आहे. माहे मे करीता मंजूर नियतन 6 हजार 459.8 मे टन असून 5 हजार 314.8 मे टन ( 82.27 %) उचल झाली असून 994.39 मे टन (15.39%) तांदूळाचे वितरण झाले आहे.


             पुणे विभागात सर्वसाधारणपणे गहू,तांदूळ,खाद्यतेल, डाळी इ. जिवनावश्यक वस्तुंची आवक ही लॉकडाऊन पुर्वीच्या आवकच्या तुलनेत सद्यस्थितीत 90.00 % आहे.


           जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नाही. जिवनावश्यक वस्तु व औषधे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले. 0 0 0 0 0