पत्रकारितेचं दुर्दैवं* .... आता ही पण काॅपी पेस्ट करु नये..... पुणे प्रवाह योद्धा कोविड १९ - 2020 करिता संपर्क साधावा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


 


साहेब...आमची तेवढी बातमी चांगली लावा.. . पण उद्या आलीच पाहिजे...याकरिता अनेक जण आग्रह धरतात. पण सद्या जाहीरात नको. तुम्हाला दिली की, सगळेच मागतात. अरे पण...अडचणीच्या काळात दुर्दैवाने आपल्या हितचिंतकांना एक माणूस म्हणून पत्रकारांची कधीच आठवण होताना दिसत नाही, याचंच तर दुःख वाटतं. आणि काय ओ...पत्रकार हा माणूस नाहीय का ? त्याला स्वत:चा परिवार नाही का ? पत्रकार हा फक्त बातम्या देण्यापुरताच मर्यादित असतो का ? भले भले प्रश्न आज सतावत आहेत. पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराचे अस्तित्वात धोक्यात आले असल्याचे एका मागोमाग एक होणाऱ्या पत्रकारांच्या घटना दिसून येते.


       सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे सगळीकडे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येकजण जिवाच्या भीतीने घरात कोंडून बसला आहे. त्यांचीच काळजी घेण्यासाठी पोलिस, डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर फिल्डवर्क करत आहेत. सर्व दैनंदिन घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवीत आहेत. अशा कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणारे पत्रकार बांधव, अन् त्यांचा परिवार कसा आहे ? काही अडचण तर नाही ना त्याला...असा क्षणीक दिलासादायक एकही शब्द अथवा फोन ऐकावयास मिळत नाही, ही स्वतःला महान (?) नेता, पुढारी, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी म्हणविणाऱ्यांसाठी ही तर लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे कधी कधी हीच खंत मनाला वेदना देऊन जाते. आपण केवळ समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेने पत्रकार हा इतरांना न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी नाहक मोठ-मोठी संकटे अंगावर ओढवून घेतो. सतत इतरांसाठी धडपडणारा हा घटक कधीही जात-पात, धर्म पाहत नाही. न्याय-नीती, समाजातील अनिष्ट चालीरीती, गुंड-गुन्हेगारीशी लढताना आपलं घर वाऱ्यावर सोडून प्रत्येकाच्या कुटुंबातला सदस्य असल्यासारखा अडचणीत सर्वांना मदत करतो. मात्र संकटात धावणारा आपला बांधव केवळ कौतुकाची बातमी देण्यापुरताच आहे काय...? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ज्यांची खरंच सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी आहे तेच पत्रकार बांधवांचा विचार करू शकतात. 


सुज्ञास अधिक सांगणे न लगे...


 समस्त पत्रकारांची भावना__________✍🏻 


*धन्यवाद* 


*आपलाच एक पत्रकार*