कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी मध्ये योग्यती सक्त कार्यवाही करावी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


.


                                                         मा.महापौर राहुलदादा जाधव


 कोरोनाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण राज्यामध्ये त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी परिसर पूर्णपणे परत एकदा पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन करावा, अशी मागणी मा.महापौर राहुलदादा जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. निवेदनामध्ये राहुलदादा जाधव यांनी सांगितले की जाधववाडी परिसरामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता, परंतु मागील दोन दिवसांमध्ये एकदम तीन रुग्ण आढळून आले आहेत. जाधववाडी आणि परिसरा मध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी जाधववाडी मधील राष्ट्रभूषन हौसिंग सोसायटी तसेच सिल्वर सिटी, क्रिस्टल सिटी परिसर प्रशासनाच्या वतीने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, या वेळी मा.महापौर राहुलदादा जाधव हे आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्या सोबत स्वतः हजर होते. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे करावे असे आव्हान राहुलदादा जाधव यांनी केले.


 


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)