कर्जत बोरवाडी मध्ये उत्तरकार्य ठरले कोरोना ला निमंत्रण देणारे... 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 आतापर्यंत उपस्थित 16 जण कोरोना बधित


कर्जत तालुक्यात आज 22 नवीन रुग्ण


कर्जत .28 गणेश पवार


                कर्जत तालुक्याला बसत असलेला कोरोना चा विळखा आणखी घट्ट बसत आहे.तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरच्या पुढे गेली आहे.मात्र त्यात आता किरवली ग्रामपंचायत मधील बोरवाडी मध्ये झालेले उत्तरकार्य महाग पडले आहे.उत्तरकार्यात सहभागी झालेल्या आतापर्यंत 16 जण कोरोना बाधित झाले आहेत.27 जून रोजी कर्जत तालुक्यात तब्बल 22 नवीन रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे.


                    कर्जत तालुक्याला कोरोना चा विळखा घट्ट बसत चालला असल्याचे दिसून येत आहे,26 जून पर्यंत कर्जत तालुक्यातील 91 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह होते.26जून रोजी रात्री नेरळ परिसरातील ममदापूर गावात आणखी तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.ममदापूर गावातील एका 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला होता.त्या महिलेच्या मुलगा सदर महिलेच्या मृत्यूच्या वेळी कोरोना पॉझिटिव्ह होता.त्या मृत महिलेच्या कुटुंबातील आणखी तीन व्यक्तींचे कोरोना टेस्ट चे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात त्या मृत महिलेचा मुलगा,सून आणि नातवाचा समावेश आहे.या तीन नवीन रुग्णांमुळे ममदापूर भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 वर पोहचली आहे.आज नेरळ गावातील कुंभारआळी भागातील 71 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.ही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती बदलापूर येथे डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मागील आठवड्यात ये जा करीत होते.नेरळ गावात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत,मात्र तरीही नेरळमध्ये कोणत्याही स्वरूपात सोशल डिस्टनसिंग पाळला जात नाही.आज कर्जत पोलीस ठाण्यातील आणखी एका महिला पोलीस यांना कोरोना ची लागण झाली आहे.


                 मात्र कर्जत तालुक्यात खळबळ माजाणारी घटना कर्जत शहाराला लागून असलेल्या किरवली ग्रामपंचायत मधील बोरवाडी गावात घडत आहे.तेथील एका नामवंत व्यक्तीचे निधन झाले होते आणि त्या व्यक्तीचे दशक्रिया विधी तसेच उत्तरकार्य हे 18 जून रोजीआयोजित करण्यात आले होते.त्या दोन्ही कार्यात मोठ्या प्रमाणात लोक जमले होते, मात्र ज्या कुटुंबातील ती नामवंत व्यक्तीचे निधन झाले होते.या कुटुंबाबतील एका 61वर्षीय महिलेचे कोरोना टेस्टचे अहवाल 25 जून रोजी पॉझिटिव्ह आले होते.परंतु 18 जून च्या दिवशी कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या अनेक लोकांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती.त्यामुळे 25 जुन रोजी साधारण 45 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या.त्यातील तब्बल 15 जणांच्या कोरोना टेस्ट या आज 27 जुन रोजी पॉझिटिव्ह आल्या आहेत.त्यात बोरवाडी,कर्जत- भिसेगाव,आणि कर्जत-दहिवली पाटील आळी तसेच डिकसळ, वंजारवाडी आणि चोरावळे येथील 15 नातेवाईक हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत.त्यामुळे बोरवाडी गावातील उत्तरकार्य कार्यामुळे परीसरात कोरोनाची भीती पसरली आहे.


                 त्याचवेळी कर्जत शहरात आज दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून हे दोन्ही रुग्ण पती-पत्नी आहेत.कर्जत शहरातील विठ्ठल नगर भागातील हरिओम गृहनिर्माण संकुलात हे कुटुंब राहते.तर कर्जत शहरालगत असलेल्या हालीवली ग्रामपंचायत मधील ज्ञानदीप सोसायटी मधील एका 29 वर्षीय महिलेला देखील कोरोना ची लागण झाली आहे.ज्ञानदीप सोसायटी मध्ये मागील काही दिवस सातत्याने कोरोना चे रुग्ण आढळून येत आहेत.आज 27 जून रोजी कर्जत तालुक्यात 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे.त्यामुळे तालुक्यातील एकूण