पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 लागू                          जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**            


 


पुणे,दि. 1 : पुणे ग्रामीण जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रियासंहिता 1973 कलम 144 (1 (3) प्रमाणे शासनाकडील 31 मे 2020 चे अधिसूचने नुसार अत्यावश्यक कारणा शिवाय वैयक्तीकरित्या नागरिकांना संचारास मनाई करन्याकामी दिनांक 1जून 2020 ते 30 जून 2020 पर्यंत दररोज रात्री 9 पासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू केलेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश.            


        जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचेअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनकायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड -19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी शासनाने संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा केलेली असून त्यास वाचा क्र. 7 अन्वये 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ आणि टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी "मिशन बिगीन अगेन" बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.            


        भारत सरकार व महाराष्ट्र सरकार आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात लोकांनी येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे थांबणे, चर्चाकरणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्या करीता तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 हे महसूल व वनविभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अधिसूचना क्र. डिएमयू/2020, सीआर.92/डिआयएसएम-04,दि. 31 मे 2020 रोजीच्या अधिसूचनेमधील निर्देशाप्रमाणे दि. 1 जून2020 ते 30 जून 2020 पर्यंत संपुर्ण देशात संचारबंदी लागू केलेली आहे. तसेच पुणे फौजदारी दंड प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना कोणत्याही रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली इ. ठिकाणी संचार वाहतूक,फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्य मनाई करणारा आदेश  30 जून 2020 पर्यंत दररोज रात्री 9 ते सकाळी 5वा. दरम्यान लागू  करण्यात आला आहे.            पूणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत,नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीत संचारबंदी कालावधी वगळता इतर वेळी मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधिन राहून परवानगी राहील.           


       पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी संचारबंदी कालावधीत पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात विनाकारण अनावश्यक वावरणा-या  व्यक्तींवर योग्य तो पोलिस बंदोबस्त नेमणूक करुन नियंत्रण ठेवावे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भारतील साथ रोग नियंत्रणअधिनियम 1897 व भारतीय दंड विधान 1860 कायद्याचे कलम 188 प्रमाणे सर्व संबंधित दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केलेआहे.


0000


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या