छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत शिवराज्याभिषेक सोहळा शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत शिवराज्याभिषेक सोहळा शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा*


 


६ जून २०२० रोजी १०० आत्महात्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पत्नींना धान्य व शेतीसाठी बी बियाणे वाटप करून शिवराज्याभिषेक सोहळा छावा संघटनेकडून साजरा करण्यात आला. 


 


दुष्काळ व कर्जबाजारीपणा या गोष्टींना कंटाळून ज्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांच्या पत्नी आज लाॅकडाऊन मुळे काय हलाखीचे जीवन जगत असतील किंवा त्यांच्याकडे आपण माणुसकीच्या नात्याने आपण पाहिले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम छावा प्रमुख धनंजय जाधव यांच्या वतीने राबविण्यात आला. 


 


खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या धर्मपत्नी संयोगिता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पत्नींना गाव तलवाडा ता. गेवराई जि. बीड येथे अन्नधान्य वाटप व साडीचोळी सोबत शेतीमध्ये लागणारे चांगल्या प्रतीचे बी बियाणे हे त्यांच्या बांधावर जाऊन देण्यात आले. सोबतच युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पत्नीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. 


 


छावाप्रमुख धनंजय जाधव, सोमनाथ ढोले यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त व गणेश सोनवणे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय सदाशिव सोनवणे व मित्र स्वर्गीय किशोर गिरमे यांच्या स्मरणार्थ बी बियाणे वाटून हा उपक्रम राबवला.या उपक्रमासाठी गेवराई पंचायत समितीच्या सदस्य पुजाताई मोरे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी गंगाधर काळकुटे, सौरभ दोंडकर, प्रणय शेंडे, अभिजित उकारडे, यशवंत बागल उपस्थित होते.