ड्रूमद्वारे ‘जम्पस्टार्ट’ या घरपोच वाहन दुरुस्ती सेवेची सुरुवात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


ड्रूमद्वारे ‘जम्पस्टार्ट’ या घरपोच वाहन दुरुस्ती सेवेची सुरुवात


~ लॉकडाउनपश्चात वाहन सुरु करताना उद्भवणा-या समस्येचे समाधान ~


मुंबई, ६ मे २०२०: लॉकडाउनमुळे बराच काळ वाहने एकाच जागेवर उभी आहेत. अशात डेड बॅटरी, इंधन पंप गळती, इग्निशन इश्यू, फअलॅट टायर्स आदी समस्या उद्भवू शकतात. लॉकडाऊन संपल्यावर आपले वाहन सुरु करताना मालकांना अशा आव्हानांचा सामना कारवाया लागू शकतो. ही समस्या सोडवण्यासाठी भारतातील सर्वात मोठा आणि अग्रेसर ऑनलाइन ऑटोमोबाइल ट्रान्सपोर्ट मार्केटप्लेस असलेल्या ड्रूमने संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी जम्पस्टार्ट-ऑटोकेअर नावाची एक अनोखी घरपोच) सेवा सुरू केली आहे. या सेवेत टायर्सची देखभाल, महत्त्वाच्या भागांची तपासणी, ऑइल व लुब्रिकंट टॉप अपसह वाहनांच्या जम्पस्टार्टचा समावेश आहे.


मुख्य जम्पस्टार्ट डिव्हाइस पॅकेजसह यूझर टोइंग, गॅस फिल, फ्लॅट टायरची दुरूस्ती, प्रेशर वॉटर क्लीनिंग आणि ऑइल, ल्यूब्रिकंट, कूलंट इत्यादीसाठी टॉप अप सेवांचा लाभ घेता येईल.


यूझर्सना वाहन, लोकेशन, मेन सर्व्हिस आणि या प्रक्रियेत कोणत्याही अॅड ऑन सेवांची निवड करता येऊ शकते. ते आपल्या सोयीनुसार, टाइम स्लॉट निवडू शकतात आणि पेमेंटची हमी देऊन नंतरही पेमेंट करू शकतकात. त्यानंतर ड्रूम हे काम करण्यासाठी एक ‘इको-निंजा’ किंवा तंत्रज्ञ नियुक्त करते. हा तंत्रज्ञ सर्व्हिसिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्राहकाला इको जम्प स्टार्ट रिपोर्ट देतो. ग्राहक ऐनवेळी तंत्रज्ञाला निश्चित केलेल्या पॅकेजमध्ये आणखी अतिरिक्त सेवा देण्यासही सांगू शकतो.


ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल म्हणाले,‘‘लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर एका अंदाजानुसार, भारतात सुमारे ५ ते २५ दशलक्ष वाहने सुरु होण्यास किंवा जागेवरून हलण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. या सुविधेचा फायदा ग्राहकांना आपली वाहने सुरु करताना होऊ शकतो. आमच्या ग्राहकांची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी मार्च महिन्यात आम्ही जर्म शील्ड लाँच केले. तसेच येत्या काळात अशाच प्रकारे अनोखी सेवा देणार आहोत.”


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image