कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या आठवड्यात २० टक्क्यांची वाढ: एंजल ब्रोकिंग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या आठवड्यात २० टक्क्यांची वाढ: एंजल ब्रोकिंग


मुंबई, ११ मे २०२०: ओपेक अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलिअम एक्सपोर्टिंग कंट्रीजने आक्रमकरित्या उत्पदनात कपात केल्याने गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. ओपेकने कच्च्या तेल्याचे उत्पादन १ मे २०२० पासून दिवसाला ९.७ दशलक्ष बॅरलने कमी केले आहे.


सौदी अरेबियाने कच्च्या तेलाची निर्यात दहा वर्षांमधील सर्वात कमी पातळीवर केली आणि कच्च्या तेलाची अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) वाढवली. या उद्योगात सर्वात महत्त्वाचा वाटा हवाई आणि रस्ते वाहतुकीचा असताना त्यावर निर्बंध आल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला आहे.


गेल्या आठवड्यात, प्रमुख अर्थव्यवस्थांची स्थिती कमकुवत झाल्याने सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला व स्पॉट गोल्डच्या किंमती १.२ टक्क्यांनी वाढल्या. तेलाच्या किंमतीत झालेली सुधारणा आणि लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिलतेमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. अमेरिकन डॉलर वाढल्यामुळे इतर चलनधारकांना सोने महाग पडत असल्याने पिवळ्या धातूच्या किंमतीवर मर्यादा आल्या आहेत.


मागील आठवड्यात स्पॉट सिल्व्हरच्या किंमती २.८६ टक्क्यांनी वाढून १५.५ डॉलर प्रति औसांवर पोहोचल्या. एमसीएक्सवरील किंमतही ५.६ टक्क्यांनी वाढून ४३,२९३ रुपये प्रति किलोवर बंद झाली.


Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image