माथेरानमध्ये लॉकडाऊनचा बळी,व्यवसाय नसल्याने अश्वचालकाने घेतला गळफास

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


माथेरानमध्ये लॉकडाऊनचा बळी,व्यवसाय नसल्याने अश्वचालकाने घेतला गळफास 

नेरळ,ता.10 गणेश पवार

                     मुंबई पासून सर्वात जवळ असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ 17 मार्च पासून पर्यटन व्यवसायासाठी बंद आहे.व्यवसाय बंद असल्याने अश्वचालक यांची उपासमार सुरू आहे,लॉक डाऊन उठत नसल्याने अखेर एका 43 वर्षीय अश्वचालकाने आत्महत्या करून स्वतःला संपवून घेतले.दरम्यान, विदर्भातील असंख्य कामगार मध्ये हातरिक्षा ओढण्याचे आणि अश्वचालक म्हणून काम करतात आणि आपल्या घरी काहीही मदत पाठवू शकले नसल्याने त्यांनी स्वतःला संपवून घेतले.

            सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असुन राज्य सरकारने या परिस्थितीला नियंत्रणात आणण्याकरिता लॉकडाऊन  वाढवल्याने राज्यात अनेक मजुर अडकुन पडले आहेत.अशातच माथेरान येथे घोड्यावर चालकाचे काम करण्यासाठी आलेला विलास धर्माजी कांबळे वय 43 वर्षीय राहणार ढोनी मनोरा जिल्हा वाशिम याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

                      सदर घटनेतील मयत विलास कांबळे हा गेले पाच वर्षापासुन पंचवटी नगर माथेरान येथील अशरद महाबळे या घोडे मालकाकडे मजुर कामासाठी राहत होता.लॉकडाऊन मुळे येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्यामुळे हातातील कामच बंद झाले आपल्या कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा या विचाराने चिंताग्रस्त असलेल्या विलासला लॉकडाऊनमुळे गावाकडे जाण्यासाठी देखील मिळत नव्हते.यामुळे पत्नी मुलांच्या विरहाने मानसिक तनावाखाली आसल्यामुळे आज 9 मे रोजी महाबळे यांच्या घरा शेजारील घोड्यांच्या तबेल्यात या मजुराने गळफास घेतल्याची येथील स्थानिकांमध्ये चर्चा  आहे.या घटनेची माहीती माथेरान पोलिसांना मिळताच  घटनास्थळी धाव घेऊन सहा. पो.निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवाजी पानपट्टे,पोलिस शिपाई श्याम जाधव, यांनी घटनेचा पंचनामा करुन माथेरान पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विलास याचा मृतदेह शवविच्छेदना करिता बि.जे. हॉस्पिटल माथेरान येथे पाठविण्यात आला आहे.