दैनंदिन जीवनातील सौंदर्यासाठी ओरिफ्लेमची 'ऑनकलर' श्रेणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


~ लिपस्टीक, नेल पेंट्स आणि फेस पावडरचा समावेश ~


 


मुंबई, २६ मे २०२०: ओरिफ्लेम या अग्रगण्य स्विडिश थेट विक्री करणा-या ब्युटी ब्रँडने ऑनकलर या व्हायब्रंट कलर मेकअपची श्रेणी सादर केली आहे. बोल्ड आणि ब्राइट रंगांमध्ये मेकअप करण्यासाठी यात विविध प्रकारचे लिपस्टीक, नेल पेंट्स आणि प्रत्येक प्रकारच्या त्वचेला पूरक ठरतील अशा फेस पावडरचा समावेश आहे.


 


नवे ऑनकलर लिपस्टिक हे १२ रंगछटांमध्ये उपलब्ध असून क्रिम कंफर्ट कॉम्प्लेक्समुळे अधिक गुळगुळीतपणा आणि मऊपणा येतो. यातील प्रत्येक रंगछटा ही व्हायब्रंट पिगमेंट ब्लेंडने तयार केलेली असून यामुळे तारुण्यसुलभ, ताजा आणि खास उन्हाळी लुक येतो. यातील क्रीमी फॉर्म्युला हा सर्व प्रसंगांना साजेशा असा पोत ओठांना देतो.


 


ऑनकलर फेस पावडर हे रंगद्रव्यांमध्ये उत्तम असून विविध प्रकारच्या त्वचेसाठी हे पूरक ठरते. उन्हाळ्यातील महिन्यांमध्ये या पावडरचा कमी वजनाचा पोत त्वचेला अधिक परिपक्व बनवून ती विविध प्रकारे मुलायम ठेवण्यासाठी मदत करतो. वापरायला सोयीस्कर आणि सोपे असलेले हे पावडर दीर्घकाळ त्वचेवर टिकते आणि दिवसभर त्वचेवर आलेला घाम शोषून घेण्यास मदत करते. ऑनकलर फेस पावडर दोन रंगांमध्ये उपलब्ध असून उजळ त्वचेसाठी फिक्या रंगाचा शेड तर मध्यम प्रकारच्या त्वचेसाठी नैसर्गिक रंगछटेचा पावडर लावणे फायद्याचे ठरू शकते.


 


ओरिफ्लेम साउथ आशियाचे रिजनल मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ संचालक श्री नवीन आनंद म्हणाले, ‘ओरिफ्लेममध्ये आम्ही नेहमीच ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण, अधिक दर्जेदार उत्पादने पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. ऑनकलर रेंजमधून आमची ब्रँड फिलॉसॉफी प्रतिबिंबीत होते. तसेच यातून तारुण्यासम ताजेपणा दिसून येतो. याद्वारे ब्राइट, व्हायब्रंट रंगछटा नव्याने येत असून ऑनकलर उत्पादने ही आयुष्यात विविध रंग आणि सौंदर्य प्रदान करतील.’