पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आयसीएआय'तर्फे येत्या सोमवारी (११)'
लाईव्ह वेबिनार'द्वारे करिअर कौन्सलिंग
पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास मंडळाच्या अंतर्गत सोमवार, दि. ११ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता युट्युबवरून लाईव्ह वेबिनारद्वारे हे मार्गदर्शन होणार आहे. हे वेबिनार मोफत असले, तरी नियोजनाच्या दृष्टीने पूर्वनोंदणी आवश्यक आहे. https://www.surveymonkey.com/r/M972BZW यावर नावनोंदणी करावी. हे वेबिनार www.youtube.com/puneicaiofficial यावर लाईव्ह पाहता येणार आहे.
'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए जय छायरा, 'डब्ल्यूआयआरसी' खजिनदार सीए आनंद जाखोटीया, पुणे शाखेचे चेअरमन सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशीनाथ पठारे यांच्यासह विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ या मार्गदर्शन सत्रात करिअर कौन्सलिंग करणार आहेत. विदयार्थी आणि पालकांच्या मनात कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत, असा मोठा प्रश्न असतो. त्याचे शंका निरसण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला आहे. सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीए नंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, अशा वेगवेगळ्या विषयी माहिती दिली जाणार आहे.