चीनमध्ये तांबा आणि बेस मेटलची मागणी वाढल्याने किमतीत वाढ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, २७ मे २०२०: सोमवारी, एलएमई बेस मेटलच्या किंमतीत सुधारणा झाली. तसेच अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या तणावाने निर्माम झालेल्या चिंतेने बाजारावर परिणाम झाला. चीनने आणलेली प्रोत्साहनपर योजना औद्योगिक धातूंची मागणी वाढण्यात मदत करेल. कारण यात पायाभूत सुविधांवर भरपूर खर्च करण्यात येणार आहे. चीनमध्ये बेस मेटलची मागणी वाढल्याने, चीनमधील धातूची आयातही वाढली आहे. त्यामुळे बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळाला आहे. यामुळे चीन धातूचा प्रमुख ग्राहक ठरत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


 


सोमवारी, एलएमई कॉपरची किंमत १.४ टक्क्यांनी वाढून ५३६२ डॉलर प्रति टन या दराने वाढल्या. चीनमध्ये तांब्याची मागणी वाढण्याची आशा असल्याने प्रमुख धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. मात्र, मंदी आणि अमेरिका-चीनमधील संबंध अधिक बिघडण्यामुळे येत्या काही दिवसात तांब्याच्या किंमतीवर परिणाम होऊ शकेल.


 


सोमवारी सोन्याच्या किंमती १.०४ टक्क्यांनी कमी होऊन सोने १७११.२ डॉलर प्रति औसांवर आले. व्यापारविषयक घडामोडी सुरू झाल्यामुळे गुंतवणूकदार जोखीमीच्या मालमत्तेकडे वळाले. परिणामी सोन्याच्या किंमती घसरल्या. अमेरिका आणि चीन यासारख्या प्रमुख भागधारकांमधील तणावामुळेही जागतिक अर्थव्यवस्थेला अधिक फटका बसत आहे. तथापि सुरक्षित यलो मेटल असलेल्या सोन्याच्या किंमती घसरण्यावरही मर्यादा असल्याचे आर्थिक आकडेवारीवरून दिसून आले.


 


स्पॉट सिल्व्हरच्या किंमती ०.५८ टक्क्यांनी घसरल्या. त्या १७.१ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमतीही ०.९ टक्क्यांनी घसरून ४७,८२१ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.


 


कच्च्या तेलाच्या किंमती ३.३ टक्क्यांनी वाढून ३४.४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या किंमतीवर बंद झाल्या. जगात कच्च्या तेलाची मागणी वाढेल या अपेक्षेने तसेच महत्त्वाच्या तेल निर्मात्यांनी आक्रमकरित्या उत्पादन कपात केल्याने तेलाच्या किंमतींना आधार मिळाला.