मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम
पुणे, दि.10-
 दौंड व पुरंदर तालुक्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या मध्यप्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वे द्वारे दौंड रेल्वे स्टेशन  येथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
आज  एकूण 1172 मजूर व त्यांचे कुटुंब यांना मध्यप्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये पाठवण्याची सोय करण्यात आली. या मजुरांना पाठवताना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून प्राथमिक तपासणी व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून शिस्तबद्धरित्या पाठवण्यात आले. सर्व मजुरांना पाठवण्याचे  नियोजन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार व  प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  तहसिलदार  संजय पाटील व सर्व महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन व नगरपालिका यांच्या साहाय्याने पार पडले.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image