पुणे प्रवाह न्युज पोर्टल
'देवों के देव महादेव' टेलिव्हिजन मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून दिसलेली अभिनेत्री आर्या वोरा लॉकडाऊनमध्ये तिचे स्वत:चे युट्यूब चॅनल घेऊन आलीय. सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आर्या वोरा आपल्या फॅशन, लाइफस्टाइल ब्लॉग्ससाठी प्रसिध्द आहे.
आपल्या व्हिडीयोब्लॉगव्दारे आपल्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली आर्या आता स्वत:चे युट्यूब चॅनल लॉकडाऊच्या काळात सुरू करण्याविषयी सांगते, “लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. सोशल मीडियावरून माझ्या शुभचिंतकांनी आणि चाहत्यांनी बराचकाळ मला स्वत:चे युट्यूब चॅनल घेऊन येण्याविषयी सुचवले होते. शेवटी ह्या लॉकडाऊनच्या काळात मी माझे स्वत:चे युट्यूब चॅनल घेऊन आलीय. चॅनलची सुरूवात एक-दिड महिन्यापूर्वीच झालीय. पण रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, “
आर्या एक सोलो ट्रॅव्हलर आहे. तिला नव-नव्या ठिकाणी जायला आवडतं. आपल्या युट्यूब चॅनलव्दारे ती आपल्या चाहत्यांना अनेक नवी ठिकाणंही दाखवताना दिसेल. आर्या म्हणते, “मी कुकिंग, फॅशन, डान्सिंग, कॉमेडी, ट्रॅव्हलिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी युट्यूब चॅनलवर एक्स्प्लोर करताना दिसेन. मला देशविदेशातल्या नवनव्या आणि विशेष म्हणजे अशा चॅलेंजिंग ठिकाणांना भेट द्यायला आवडतं. जिथे पोहोचणं आणि राहणं कठीण असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर लॉकडाऊनच्या काळातली मुंबई मी चित्रीत केली आणि त्या व्हिडीयोला रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामूळे ह्यापूढेही नवनव्या कल्पनांसह मी व्हिडीयो घेऊन रसिकांच्या भेटीला येत राहीन.”