आमदार महेंद्र थोरवे यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


कर्जत-खालापूर साठी कोविड रुग्णालयाची मागणी


 


कर्जत,ता.31 गणेश पवार


 


                         कर्जत आणि खालापूर तालुक्यात कोरोना विषाणू यांचा संसर्ग रोखून धरण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे.मात्र तरीदेखील या दोन्ही तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर कर्जत आणि खालापूर तालुक्यात उपचार व्हायला हवेत यासाठी शासनाने खासगी रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्याची कार्यवाही सुरू करावी अशी मागणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या संवादात बोलताना केली.


 


                         जागतिक महासंकट असणाऱ्या कोरोना संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिवसेनेच्या सर्व आमदारांशी संवाद साधला.कर्जत विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी काही मुद्दे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.लॉकडाऊनमुळे सर्वत्र रोजगार नाही आणि मोठ्या प्रमाणात असलेला औद्योगिक वसाहती या बंद आहेत,तेथील असंख्य कंपन्या बंद आहेत. त्यामुळे तेथील कामगारांना वेळेवर किंवा पगारही मिळत नाही.अशा कामगार वर्गाला शासनाकडून आदेश पारित करून मदत करावी अशी मागणी आमदार थोरवे यांनी केली. 


 


                         सध्या कर्जत तालुक्यात करोना रुग्णांची संख्या कमी असल्याने त्यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात येत आहे. परंतु भविष्यात येथे रुग्णसंख्खा वाढली तर कर्जत-खालापूर या दोन्ही तालुक्यांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्यात यावे अशी आग्रही मागणी थोरवे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे केली.तर कर्जत खालापूर या मतदार संघात 25% आदिवासी समाज राहत असून लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारी आली आहे.तरी अशा आदिवासी वर्गसाठी मदतीची ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी आणि अनेक समस्या माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समक्ष मांडल्या.


 


 


 


 


 


फोटो ओळ 


 


आमदार महेंद्र थोरवे


 


छायः गणेश पवार