पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन यंदा साधेपणाने साजरा होणार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन

यंदा साधेपणाने साजरा होणार

 

पुणे : शिक्षण क्षेत्रातील नामांकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा १११ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे आणि फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम-लक्ष्मण आणि कुलगुरू कै. दादासाहेब केतकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. 

 

कोरोनामुळे यंदा वेदघोष आणि स्वागत समारंभ रद्द करण्यात आले आहेत. संस्थेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि कर्मचारी-सेवक वर्गाने याची नोंद घ्यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.