बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये वृद्धी: एंजल ब्रोकिंग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये वृद्धी: एंजल ब्रोकिंग


मुंबई, २८ एप्रिल २०२०:आरबीआयने म्युच्युअल फंड बाजारपेठेत केलेल्या गुंतवणुकीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारामध्ये दिसून आला. बँकिंग, आयटीसह तेल व वायू कंपन्यांच्या शेअर्समध्ये वृद्धी दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. निफ्टी बँकेने आज २.५२ टक्क्यांची वृद्धी घेतली तर निफ्टी प्रायव्हेट बँकेनेही २.९९ टक्क्यांची वाढ दर्शवली. आरबीएलने आज ८.९१ टक्क्यांची वाढ घेतली तर त्यापाठोपाठ इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँकेनेही अनुक्रमे ६.४० टक्के, ५.७८ टक्के आणि ५.१७ टक्क्यांची वाढ दर्शवली. केवळ एचडीएफसी बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने निफ्टी बँकेत लालबत्ती दाखवत सब-१% तोटा दर्शवला.


निफ्टी आयटीने आज ९ स्टॉकमध्ये प्रगती आणि १ स्टॉकमध्ये अधोगती दर्शवली. बीएसई इन्फोटेकमध्ये ३९ स्टॉक्समध्ये प्रगती तर १९ मध्ये घट दिसून आली. बीएसईमध्ये क्विक हिलने १६.७ टक्के वृद्धीसह या प्रगतीचे नेतृत्व केले. आयटी क्षेत्रातील एचसीएल टेक्नोलॉजीज, विप्रो आणि टेक महिंद्रा यासारख्या सर्व कंपन्यांनी वृद्धी केली. निफ्टीमध्ये माइंड ट्रीने सर्वाधिक चढाई करत त्रैमासिक निकालाच्या पार्श्वभूमीवर १२.७३ टक्क्यांची प्रगती साधली. नि6फ्टीच्या आयटी इंडेक्समध्ये जस्ट डायल ५.७२ टक्क्यांच्या वृद्धीसह दुसऱ्या क्रमांकावर होता तर त्यानंतरच्या क्रमांकावरील एमफॅसिसने ३.६४ टक्क्यांची वृद्धी दर्शवली.


कच्या तेलाच्या जागतिक पातळीवर कमकुवत झालेल्या किंमतींच्या पार्श्वभूमीवरदेखील आज इंडियन ऑइल आणि गॅस प्लेअर्सनी बाजारात सकारात्मक चित्र दर्शवले. एचपीसीएलने ३.४८ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. तर त्यानंतर पेट्रोनेट एलएनजीने ३.२३ टक्क्यांची वाढ घेतली. आयजीएल, बीपीसीएल, ओएनजीसी आणि आरआयएलनेही अनुक्रमे २.३९ टक्के, १.३५ टक्के, १.३३ टक्के आणि ०.९१ टक्क्यांची प्रगती दर्शवली.