पुणे प्रवाह न्युज पोर्टल
Respected Sir / Madam,
Greetings
Press Release
*जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान, नानिजधाम यांनी कोविड – १९ या साथीच्या आजारासाठी १ कोटी २ लाख रुपयांची मदत*
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान, नानिजधाम (महाराष्ट्र) यांनी नुकतीच पीएम केयर्स यांना ५२ लाखांची मदत दिली आहे. तसेच महाराष्ट्राच्या मदत निधीमध्ये संस्थेने ५० लाखांचे अनुदानही दिले आहे. तसेच रत्नागिरीतील गरिबांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अशी माहिती रत्नागिरीचे निवासी जिल्हा अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था, नानिजधाम यांचे हे योगदान कौतुकास्पद आहे. जगदगुरूंनी आपत्कालीन परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी संपूर्ण समाजाला शुभेच्छा देखील दिल्या असून स्वामींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर handle @_Jagadguru या पेजवरून त्यांनी कोविड – १९ या आजाराशी दोन हात करणाऱ्या सर्व डॉक्टर, कर्मचारी, स्वच्छता कामगार, पोलिस, पाणी, वीज अशा इतर सरकारी विभागांच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक केले.
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान, नानिजधाम १९९४ मध्ये स्थापन झाले आणि तेव्हापासून ते सामाजिक कार्य करत आहेत.
फोटोओळ- धनादेश स्वीकारताना रत्नागिरीचे निवासी जिल्हा अधिकारी दत्ता भडकवाड