पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम


पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची पाहणी


            पुणे, दिनांक 12-  पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व साखर आयुक्त सौरभ राव यांनी संयुक्तरित्या नवीन मोदीखाना व भीमपुरा क्षेत्रातील उपाययोजनांबाबत पाहणी केली. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनेप्रमाणेच पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना करून कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.


            पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील पाहणीवेळी मेजर जनरल नवनीत कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोंमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. गायकवाड यांच्यासह पुणे कॅन्टोनमेंट, पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.


            जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील लगतच्या भवानीपेठ क्षेत्रात सुरू असलेल्या उपाययोजनेप्रमाणेच कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना राबवा,  गरजेप्रमाणे प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून या ठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूची निकड भासू नये यादृष्टीने भाजीपाला, दूध या सारख्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध होतील, या दृष्टीने समन्वय करून व्यवस्था करण्याबाबतच्या सूचनाही सबंधितांना देण्यात आल्या आहेत.


Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image