सलग दुस-या दिवशी शेअर बाजाराचे नुकसान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सलग दुस-या दिवशी शेअर बाजाराचे नुकसान


मुंबई, १२ मे २०२०: सलग दुस-या दिवशी मंगळवारी एसअँडपी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांक रेड झोनमध्ये दिसून आला. मात्र व्यापाराच्या शेवटच्या तासात शॉर्ट कव्हरिंगमुळे निर्देशांकाने काही नुकसान भरू काढले. ३० शेअर सेन्सेक्स १९०.१० अंक किंवा ०.६०% नी घसरुन ३१,३७१.१२ अंकांवर थांबला. तर निफ्टी ५० ३१.३५ अंक किंवा ०.३५% नी घसरून ९,२०७.८५ अंकांवर थांबला.


निफ्टी मिडिया निर्देशांकात १.७ टक्क्यांच्या वृद्धीसह एनएसईतील ११ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी सात निर्देशांक वधारले. तथापि, बँकिंग आणि तेल क्षेत्रातील स्टॉक्सवर आज विक्रीचा दबाव दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकिंगमुळे आरआयएलची शेअर प्राइज ६ टक्क्यांनी घसरून ती १४.८६.४५ वर बंद झाली. उद्या स्टॉक एक्स-राइटमध्ये रुपांतरीत होईल. कंपनी ५३,१०० कोटी रुपयांचे १:१५ राइट्स देईल. १४ मे रोजी प्रति शेअरची किंमत १,२५७ रुपये आहे.


बँकिंग क्षेत्रावरील संकट कायम:


निफ्टी बँक मागील १८,९५०.४० अंकांवरून १८,७५१ अंकांवर सुरु झाली. ०.४६ टक्क्यांची घसरण घेत ती १८८६२.८५ अंकांवर थांबली. खासगी क्षेत्रातील बँका मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या बँकांसह मार्केटच्या बाहेर पडल्या. कोटक महिंद्रा बँकेचे शेअर ३०.५० रुपयांनी घसरून १,१५७.९५ रुपये किंवा २.५७% नी घसरले. जपानची विमा प्रमुक निप्पॉन लाइफ इंडसइंड बँकेत धोरणात्मक गुंतवणूक करण्याच्या विचारात असल्याच्या वृत्तानंतर या बँकेची कामगिरी चांगली झाली. तिचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले.


फार्मास्युटिकल क्षेत्राने प्रॉफिट बुकिंग अनुभवले:


पिरामल एंटरप्रायझेसने २५.१० रुपये किंवा २.६९%ची घसरण घेत ९०६.५० रुपयांवर विश्रांती घेतली. इंट्रा डे सेशनमध्ये मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही १७०२.५९ कोटी रुपयांचा तोटा झाल्याने शेअर १४ टक्क्यांनी खाली घसरला. सिपला लिमिटेडनेही आज कमकुवतपणा दाखवला. या मूल्यात २.६५% घसरण होऊन ५७०.५० रुपयांवर स्टॉक बंद झाला.


 


आयटी व तंत्रज्ञानाचे बूस्टर:


आज चांगली कामगिरी करणा-या स्टॉकमध्ये आयटी आणि टेक्नोलॉजी क्षेत्रातील क्लस्टरचा समावेश आहे. संपूर्ण सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह रिमोट वर्किंग मोड्युल असलेले एनआयआयटी स्टॉक विजेते म्हणून उदयास आले. हे स्टॉक ३.२७% नी वाढून ८६.८० रुपयांवर बंद झाले. आजच्या दिवसातील १,९१०.२५ रुपयांची सर्वात निचांकी पातळी गाठणा-या टीसीएसने पुन्हा सुधारणा करत १,९४८.०० रुपयांवर विश्रांती घेतली.


रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत:


अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया १५ पैसे घसरणीसह ७५.८८ वर सुरु झाला. आशियातील इतर चलन कमकुवत असूनही अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया ७५.९५ च्या पातळीवर पोहोचला.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन