गजबजलेली मुंबई आणि ट्रॅफिक सिग्नलवर भेटणा-या मुलांच्या आठवणीने अभिनेत्री  सुरेखा कुडची झाल्या भावूक 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


गजबजलेली मुंबई आणि ट्रॅफिक सिग्नलवर भेटणा-या मुलांच्या आठवणीने अभिनेत्री  सुरेखा कुडची झाल्या भावूक

 

कोरोनामूळे मुंबापुरीचा आणि सिनेसृष्टीचा झगमगाटच हरपला आहे. न थांबणा-या मुंबईला तर जणू कुणाचीतरी नजरच लागल्यासारखा शुकशुकाट पसरलाय. आणि हेच दु:ख सिनेनाट्यसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडचींना सतावतंय. 

 

मराठी बॉक्स ऑफिस ह्या वेबसाईटच्या सोशल मीडियावर नुकताच 'मास्तर स्ट्रोक'  हा ला्इव्ह गप्पांचा कार्यक्रम सुरू झालाय. ह्या गप्पांच्या कार्यक्रमात अर्थातच सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या लॉकडाऊनचा मुद्दा चर्चेत आला. आणि सुरेखा कुडची अचानक गहिवरल्या. 

 

सुरेखाताई आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, " मुंबईने आजवर अनेक संकटांशी दोन हात केले. प्रत्येकवेळी मुंबईने आपलं फाइटिंग स्पिरीट जगाला दाखवून दिलंय. पूर असो, की बॉम्बस्फोट प्रत्येक संकटाला एकत्रितपणे येऊन मुंबईकर तोंड देत आलेत. तेव्हा कधीच मुंबई बंद झाली नाही. पण ह्या कोरोना व्हायरसमूळे माझी धावती मुंबई आज बंद असल्याचं दु:ख वाटतंय." 

 

त्यापूढे त्या म्हणाल्या, "मुंबई म्हणजे ट्रॅफिक, असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षात झालंय. एरवी ट्रॅफिक दिसलं की त्रासलेली मी आजमात्र त्याच ट्रॅफिकला खूप मिस करतेय. ट्रॅफिक सिग्रलवरची भिक मागणारी मुलं दिसली की माझी चिडचिड व्हायची  मात्र आता मी त्यांच्या आठवणीने व्याकुळ झालीय. मला ते ट्रॅफिक, तो गोंगाट चालेल. पण ही मुंबईमध्ये सर्वत्र पसरलेली जीवघेणी भयाण शांतता लवकरात लवकर संपावी अशी मी आशा करतेय"