समिर पायगुडे यांच्या वतीने ३५० हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप -    कुडजे गावकऱ्यांनी केले पुष्पवृष्टीने पोलिसांचे स्वागत -    वाढदिवासाचा खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


समिर पायगुडे यांच्या वतीने ३५० हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


-    कुडजे गावकऱ्यांनी केले पुष्पवृष्टीने पोलिसांचे स्वागत


-    वाढदिवासाचा खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी


 


पुणे, दि. २ – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता गावातील ३५० हून अधिक गरजू कुटुंबांना किराणा सामान व जीवनश्याक वस्तूंच्या किट देऊन कुडजे गावचे माजी सरपंच समीर रवींद्र पायगुडे यांनी सामाजिक भान दाखवले आहे. तसेच कोरोनाच्या महामारीत नागरिकांची उत्तम काळजी घेणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पो. नि.  सुनील पंधरकर, पोलिस उपनिरीक्षक ढेगले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुरेश आण्णा गुजर, सरपंच अश्विनी पायगुडे, ज्ञानेश्वर पायगुडे, उपसरपंच सीमा पायगुडे. प्रियंका पायगुडे, भिकोबा पायगुडे, चेअरमन रवीद्र पायगुडे, पिंटू पायगुडे, माउली पायगुडे, सुरेश पायगुडे, सुनील खिरीड, अशोक पायगुडे, दशरथ घुमे, ग्रा.प. सदस्य प्राजक्ता लोणारे, नवनाथ निढाळकर, दत्तात्रय पायगुडे (पो.पाटिल ) राकेश पायगुडे,विलास पायगुडे, गौरव पायगुडे, अजित पायगुडे, संदिप गायकवाड मिलिंद गायकवाड ,सुनील पायगुडे ,दत्तात्रय मारणे,सुनील मारणे, राजेंद्र पायगुडे यांचे सहकार्य लाभले.