दिनानाथ मंगेशकर रुग्णालय व पुणे महानगरपालिकेत सामंजस्य करार संपन्न,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
०२/०५/२०२०,
दिनानाथ मंगेशकर रुग्णालय व पुणे महानगरपालिकेत सामंजस्य करार संपन्न,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत पुणे महानगरपालिका व लता मंगेशकर मेडिकल फौंडेशनचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यामध्ये "सामंजस्य करार", संपन्न झाला,
सदरचा करार करणेबाबत मनपा प्रशासनाच्या वतीने मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच मान्यता दिलेली होती,
सदरच्या "सामंजस्य करारावर",पुणे महानगरपालिकेच्या वतीने मा,रुबल अगरवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल ) व दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने  विश्वस्त व वैद्यकीय संचालक मा,डॉ, श्री,धनंजय केळकर यांनी सह्या केल्या,
याप्रसंगी पुणे मनपाच्या सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे व दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ,भट उपस्थित होते,
सदरच्या करारानुसार पुणे शहरातील व पुणे मनपाने शिफारस केलेले पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्ण यांच्या उपचाराकरिता रुग्णालयात १२५ बेड,व अतिदक्षता विभागातील १५,बेड, आरक्षित करण्यात येतील,
शासनाच्या योजनेनुसार रुग्णालय उपचार करणार आहेत,
या व्यतिरिक्त १२५,बेड आयसोलेशन करिता व १५,बेड आय सी यु करिता आरक्षित करण्यात येतील,
रुग्णास डिस्चार्ज दिल्यानंतर येत्या तीन महिन्यात पुणे मनपाच्या वतीने बिलांची पूर्तता  केली जाईल,
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्व जबाबदारी रुग्णालयाची राहील,
रुग्णालयास आवश्यकतेनुसार पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीपीई किट्स,एन-95,मास्क, वितरित करण्यात येतील,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
०२/०५/२०२०,