कर्जत शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर पालिका दंडात्मक कारवाई

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


कर्जत शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर पालिका दंडात्मक कारवाई

कर्जत,ता.7 गणेश पवार

                                नगरपरिषद हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावावेत आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये तसे करणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करावी असे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी आहेत.या नियमाची कर्जत नगरपालिका हद्दीत काटेकोरपणे पालन केले जाईल असे पालिकेने जाहीर केले आहे.

                             कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्याकरिता सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर कायम मास्क किंवा रुमाल वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.यापैकी कोणत्याही नियमांचे पालन न झाल्यास आपल्यावर कधीही दंडात्मक कारवाई होऊ शकते असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत.याबाबत ग्रामपंचायत, कर्जत नगरपरिषद यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020 मधील 10 नुसार प्राप्त अधिकारान्वये कोव्हिड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न वापरता वावरत असाल तर 500 रुपये दंड, तसेच सार्वजनिक स्थळी म्हणजे रस्ते, बाजार, रुग्णालय कार्यालय आदी ठिकाणी आपण थुंकत असताना आढळलात तर 500 रुपयाची दंडात्मक कारवाई होऊ शकते.फेरी,भाजीपाला विक्रेते,जीवनाश्यक वस्तू विक्रेते आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर (सोशल डीस्टंसिंग) न राखणे तसेच दोन ग्राहकांमध्ये 3 फूट अंतर न राखणे विक्रेत्यांनी मार्किंग न करणे यासाठी ग्राहकाला 200 रुपये दंड तर दुकानदार (विक्रेता) याला 1000 दंड आकारण्यात येईल. दंडात्मक रक्कम वसूल करण्याचे अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात आले आहेत.एखाद्या व्यक्तीकडून दुस-यांदा असे वर्तन झाल्यास भा .द. वि. कलम 188, 269 व 270 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951मधील कलम 115 नुसार फौजदारी कारवाईस पात्र होतील.

                            कर्जत नगरपरिषद क्षेत्रात कर्जत शहर,दहीवली, आकुर्ले, मुद्रे, भिसेगाव, गुंडगे या गावाचा सहभाग आहे या परिसरात फिरण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत यावर ही पथके लक्ष ठेवणार आहे अशी माहिती कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली. कालच भाजी विक्रते मास्क न लावता भाजी विक्री करताना आढळल्याने मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.