विश्रांतवाडी,लोहगाव या भागामधील दवाखान्यामध्ये रक्त तपासणी व एक्स-रे सेवा सुरू करण्याची मागणी ........ राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी अध्यक्षा  रेणुका हुलगेश चलवादी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे  महानगरपालिका हद्दीतील कळस,धानोरी,  विश्रांतवाडी,लोहगाव या भागामधील म.न.पा. च्या दवाखान्यामध्ये रक्त तपासणी व एक्स-रे सेवा सुरू करण्याची मागणी 
राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी अध्यक्षा  रेणुका हुलगेश चलवादी यांनी    पुणे महानगरपालिका मा. महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .
 विश्रांतवाडी परिसरातील कळस, लोहगाव,धानोरी या भागामध्ये अंदाजे दोन लाख लोकवस्ती असून विश्रांतवाडी,कळस येथे सिद्धार्थ दवाखाना आणि इंदिरानगर येथे एडवर्ड रॉक पॉल  दवाखाना आहे. संपूर्ण जगभरात कोरोणा संसर्गामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. कोरोणाबरोबरच निमोनियाची साथ असण्याची शक्यता आहे. कारण आजपर्यंत पुणे शहरामध्ये झालेल्या मृत्यूची कारणे कोरोणापेक्षा निमोनिया ने जास्त दिसून येत आहे. 
     निमोनियाच्या तपासणीकरिता रक्त तपासणी (हिमोग्रॅम) अत्यंत आवश्यक आहे तरी वरील दोन्ही दवाखान्यांमध्ये रक्त तपासणी व एक्सरे मशीन त्वरित चालू करण्यात यावी व दोन्ही दवाखाने पूर्णवेळ चालू ठेवण्यात यावे. त्यामुळे नागरिकांना उपचार घेणे सोयीचे होईल. 
           आपली विश्वासू


     रेणुका हुलगेश चलवादि 
राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी अध्यक्षा