स्पर्धात्मक अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी अड्डा२४७ची ऑनलाईन सुविधा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


स्पर्धात्मक अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी अड्डा२४७ची ऑनलाईन सुविधा


मुंबई, ३ मे एप्रिल २०२०: यूपीएससी-सीएसई, भारतीय सशस्त्र सेवेकरिता एसएसबी, गेट, आयआयटी जॅम आणि सीएलएटी यांसारख्या स्पर्धात्मक अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी देशातील आघाडीचा तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंच अड्डा२४७ने ऑनलाईन शिक्षण वर्गांची घोषणा केली आहे. तसेच हे ई-लर्निंग पोर्टल उमेदवारांच्या मुलाखतीची कौशल्ये वाढविण्यासाठी आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्यापक डिजिटल शिक्षण कार्यक्रमांकरिता देखील कार्यरत आहे.


स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणा-या उमेदवारांकरिता आवश्यक तयारी करण्यासाठी हा ऑनलाईन तंत्रज्ञान-आधारित मंच व्हर्च्युअल लाइव्ह क्लास, व्हिडीओ कोर्स आणि चाचणी मालिकेसह एक ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे.


अड्डा२४७चे सहसंस्थापक सौरभ बन्सल यांनी सांगितले की, 'लॉकडाऊन असल्याने राष्ट्रीय व राज्य स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची महत्वाकांक्षा असणार्‍या विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे. त्यांना भेडसावणारी समस्या लक्षात घेत आम्ही ऑनलाईन स्पर्धात्मक अभ्यासक्रमची एक सीरिज त्यांच्याकरिता सादर करीत आहोत. एक जबाबदार शिक्षणतज्ज्ञ आणि कॉर्पोरेट नागरिक म्हणून देशातील तरुणांच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये हे पाहणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे आम्ही समजतो.'