🚩   " कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🚩   " कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩


जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करून ज्ञानाचा दिवा घराघरांत प्रज्वलित करणा-या आणि स्वातंत्र्यचळवळीस आधारवड ठरलेल्या रयत शिक्षण संस्थेची उभारणी करणा-या डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. दि. २२ सप्टेंबर १८८७* रोजी कुंभोज (कोल्हापूर) गावी भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते असणा-या भाऊरावांनी स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्री सद्गुणांचे संस्कार समाजमनावर केले. शिक्षणातून पोषण, बुद्धिवादाने रूढिवादाचा पराभव, समतेच्या आचरणाने विषमतेचे निर्दालन, श्रमाला प्रतिष्ठा ही भाऊरावांची तत्त्वप्रणाली होती. त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याबद्दल गाडगे महाराजांना अतीव प्रेम होते. ‘प्रत्येक खेडय़ात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ असे स्वप्न बाळगणारा आणि ते प्रत्यक्षात उतरविणारा हा कर्मवीर अण्णांचा व फलटणच्या श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे अनेक वर्षांपासून स्नेहसंबंध होते.अण्णांच्या कार्याचे राजांना भारी कौतुक वाटे.ता.3 डिसेंबर 1939 रोजी बडोद्याचे युवराज श्रीमंत प्रतापसिंहमहाराज सातार्यात आले होते.त्यांचे अण्णांनी जंगी स्वागत केले होते.त्यावेळी फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे खास उपस्थित होते.कर्मवीर संस्थेतर्फे महाराज सयाजीराव मुक्तनिवासी विद्यालय जून 1947 पासून सुरू करण्याची घोषणा केली. सदर हायस्कूलला इमारत नव्हती म्हणून अण्णांनी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन आपली अडचण सांगितली.राजेसाहेबांनी सातारा येथील कलेक्टर बंगल्याच्या पिछाडीस असलेला आपला फलटण लाॅज हा बंगला ,भोवतालची 8 ते 9 एकरांच्या आवारासह ,रयतशिक्षण संस्थेस बक्षिसपत्राने दिला.याच फलटण लाॅजमध्ये जून 1947 पासून सयाजीराव हायस्कूल सुरु झाले. या वास्तूत जयप्रकाश नारायण आले होते. "येथे कर्मवीर भाऊरावांनी समाज- वादाचा खराखुरा प्रयोग सुरू केला. *स्वातंत्र्यचळवळीसाठी हजारो कार्यकर्ते तयार करणारा हा आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार, भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त्त विनम्र  अभिवादन
             लेखन ✒️
        डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
            ( इतिहास अभ्यासक )