कै,गणेशभाऊ देवराम जाधव यांचे वयाच्या  59 वर्षी आज सोमवार  दि 11/05/2020 दुःखद निधन झाले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🌹दुःखद वार्ता 🌹    
           🌹🇪🇺🕉️🇪🇺🌹
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते "अण्णा भाऊ साठे समाज भूषण पुरस्कार प्राप्त " कै,गणेशभाऊ देवराम जाधव यांचे वयाच्या  59 वर्षी आज सोमवार  दि 11/05/2020 दुःखद निधन झाले. 🌹👏🏾🌹
      वडिल  कै,देवराम जाधव हे काशिवाडी भागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते असल्याने व पुणे शहराच्या मातंग चळवळीला उतेजन देणारे निर्भिड व्यक्तीमत्व  असल्याने समाज परिवर्तनाच्या कार्यात नेहेमीच अग्रभागी राहून कार्य करत होते.त्या अनुषंगाने कै,देवराम जाधव यांनी पुणे महानगरपालिका निवडणूक लढविल्या.
अशा आपल्या वडिलांकडे समाजकारणाचे व राजकारणाचे बाळकडू घेऊन अत्यंत हालचालीच्या परिस्थिती सुध्दा  वडिलांचा कार्याचा गाडा कै,गणेशजी जाधव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालविला. 
पुणे शहर खासदारकीची निवडणूक असो किंवा काशिवाडी सारख्या भागातील पुणे महानगरपालिका निवडणूक असो हे त्यानी धैर्यानं लढवून कार्याचा ठसा उमटवलेला आहे.
त्या सामाजिक चळवळीत कामास गती यावी म्हणून मातंग समाजात स्वतःची संघटना स्थापन केली.
काशिवाडी विकास युवक संघटना, काशिवाडी शांतता समिती. अमर ज्योत तरूण मंडळ, अन्याय अत्याचार निवारण संघटना ,शांतता समिती सदस्य खडक पोलिस स्टेशन पुणे, अशा विविध संघटना व मंडळांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक पातळीवर  कार्य केले आहे. भारतीय बहुजन महासंघाचे अनेक वर्षे पुणे शहर सरचिटणीस पद त्यानी भूषविले होते.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन नुकताच त्याना महाराष्ट्र शासनाने "अण्णा भाऊ साठे समाज भूषण पुरस्कार देऊन त्याना गौरवण्यात आले आहे.
अशा समाजोपयोगी निस्वार्थ कार्यकर्त्यांची काशिवाडी व पुणे शहराच्या सामाजिक चळवळीत पोकळी निर्माण झाली. 
सर्वानी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी जेथे असाल त्या ठिकाणावरून  ईश्वर चरणी प्रार्थना करावी. 👏🏾
ईश्वर मृत्युआत्म्यास चिरशांती देवो
        जय भीम     जय लहुजी 
🕉️शांती 🕉️शांती 🕉️शांती 🕉️शांती 🕉️शांती 🕉️शांती 🕉️
पुणे शहराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 👏🏾
                शोकाकुल 
मा,महेंद्र कांबळे  
उपाध्यक्ष:आर पी आय (आठवले गट)पश्र्चिम महाराष्ट्र 


मा किशोर शिंदे 
सचिव : मातंग समाज समिती