खासगी पाईपलाईनला विरोध केल्याने हकनाक बळी गेलेल्या तरुणाला ठार करणाऱ्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


खासगी पाईपलाईनला विरोध केल्याने हकनाक बळी गेलेल्या तरुणाला ठार करणाऱ्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

कर्जत .8 गणेश पवार

                        कर्जत तालुक्यातील खांडस येथे 4 मे रोजी खासगी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्यासाठी विरोध केला म्हणून एका 49 वर्षीय तरुणाचा खून झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती आणि त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

                           कर्जत तालुक्यातील खांडस हे उन्हाळ्यात पाणीटंचाईग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते.या गावातील रहिवासी पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाझर तलावावर जातात.गावासाठी लघुपाटबंधारे विभाग 50 लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना राबवत आहे.मात्र सदर नळपाणी योजनेचे काम रखडले असल्याने गावातील काही लोकांनी एकत्र येऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलवाहिनी टाकून पाणी आपल्या कुटुंबासाठी राबविली. ग्रामपंचायतचा काहीही संबंध नसलेली पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम खून करणारे आरोपी करीत होते.त्यावेळी मयत शिवाजी गोविंद पाटील यांनी आपल्याला घर बांधायचे असल्याने तेथून पाईपलाईन टाकू नये असे सुचविले.मात्र त्याच शिवाजी गोविंद पाटील यांनी ज्या ठिकाणी चिकन कटिंग सेंटर सुरू केले होते त्यावरून देखील वाद झाला होता.चिकन सेंटर वरून वाद करणारे हेच खासगी नळाची पाईपलाईन टाकत असल्याने शिवाजी पाटील यांचा विरोध बघून सर्व एकत्र आले.     

                              4 मे रोजी सायंकाळी मच्छीन्द्र जनार्दन ऐनकर, कैलाश मनोहर ऐनकर,विलास मनोहर ऐनकर,जनार्दन मनोहर ऐनकर,मनोहर भाऊ ऐनकर, विठ्ठल भाऊ ऐनकर, प्रकाश विठ्ठल ऐनकर, बाळाराम लानु ऐनकर,जगदीश पुंडलिक ऐनकर,पुंडलिक भाऊ ऐनकर आणि गणेश पुंडलिक ऐनकर यांनी एकत्र येत लाठीकाठ्या,फावडा, टिकाव,धारदार चाकू आणि लोखंडी तलवार यांच्या साहाय्याने शिवाजी गोविंद पाटील यांचा खून केला होता.नेरळ पोलिसांनी नंतर असे सर्व 11 आरोपी यांना अटक करून त्यांच्यावर शिवाजी गोविंद पाटील यांचा खून केल्याचा गुन्हा नोंद होता. नेरळ पोलीस ठाण्यात या सर्वांवर भादवी कलम 302, 324,143,144, 147,148, 149,504 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 चे (1) (3) प्रमाणे गुन्हा ठेवण्यात आला आहे.त्या सर्वांना जिल्हा सत्र न्यायालयाने हजर केले असता खून प्रकरणी अटक असलेल्या सर्वांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे अधिक तपास करीत आहेत.