कर्जत तालुक्यातील पिंपळोली येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू.. गेली 10 दिवस सुरू होते उपचार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्जत तालुक्यातील पिंपळोली येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू..

गेली 10 दिवस सुरू होते उपचार

कुटुंबिय तपासणीसाठी खारघरच्या ग्रामविकास भवन मध्ये

कर्जत तालुक्यातील हा चौथा कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत,ता.13 गणेश पवार

                            कर्जत तालुक्यातील पिंपळोली येथे एका 48 वर्षीय व्यक्तीचे 11 मे रोजी ठाणे येथील रुग्णालयात निधन झाले.शरीरातील अन्य व्याधींवर 1 मे पासून उपचार घेत असलेल्या त्या व्यक्तीला कोरोना झाला आणि चार दिवसांनी त्या व्यक्तीचे रुग्णालयात निधन झाले.दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह चौथा रुग्ण असून वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण पिंपळोली गाव कोरोना बाधित क्षेत्र केले नाही,केवळ जवळच्या कुटुंबियांना त्यांची कोरोना टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्या टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संपूर्ण गाव सील करू शकते.

                   पिंपलोली गावातील एक 48 वर्षीय व्यक्ती ही आपल्या शरीरातील वेगवेगळ्या व्याधींवर नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात  दाखल झाली होती.सदर रुग्ण शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्ती मध्ये 5 मे रोजी कोरोना ची लक्षणे दिसून आली.कोरोनाचा टेस्ट केल्यानंतर त्या रुग्णाला 7 मे रोजी कोरोना झाला असल्याचे निष्कर्ष निघाला.त्यामुळे कोरोना वर उपचार करण्यासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.त्या ठिकाणी उपचार सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे 11 मे रोजी दुपारी निधन झाले.

                             त्यानंतर नेरळ पोलीस ठाणे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पिंपलोली येथे पोहचले आहेत. पिंपलोली येथील रुग्णाचे कुटुंबीय यांची माहिती घेण्याचे काम आरोग्य खात्याने सुरू केले.सदर रुग्ण हा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेत होता आणि त्यात कोरोना चा संसर्ग झाल्याने शासनाच्या नवीन आद्यदेशाप्रमाणे लगेच संबंधित रुग्णाचे गाव कंटेन्मेंट झोन करता येत नाही.त्यामुळे पिंपळोली गाव हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर देखील सील करण्यात आले नाही. त्याचवेळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळताच कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सी के मोरे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील पिंपळोली गावात पोहचले होते.  

 

 

 

     -- कर्जत तालुक्यातील चौथा कोरोना पॉझिटिव्ह--

पिंपळोली येथील व्यक्तीचा ठाणे येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे.सर्वात आधी ठाणे येथून नेरळ येथून ये जा करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता,तर त्याच काळात मुंबईत वोकहार्ट रुग्णालयात नोकरी करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता.तर ठाणे येथे टीसीएस कंपनीत आपल्या दुचाकी वरून जाणारा कडाव जवळील एका गावातील तरुण देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता आणि ते तिघेही तरुण हे कोरोना वर मात करून सध्या होम कोरोन्टाईन मध्ये आहेत.त्यामुळे सध्या कर्जत तालुक्यात कोरोना वर कोणत्याही दवाखान्यात  उपचार घेणारा एकही रुग्ण नाही.