कर्जत आणि नेरळ शहरातील व्यवसाय 30 मे पर्यंत बंद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्जत आणि नेरळ शहरातील व्यवसाय 30 मे पर्यंत बंद...


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय 


 


कर्जत,ता.28  गणेश पवार


 


               कर्जत तालुक्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारी घेण्यासाठी कर्जत नगरपरिषद आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी आवाहम केल्यानंतर 28 मे ते 30 मे या कालावधीत बाजारपेठ बंद राहणार आहे.पालिका आणि ग्रामपंचायत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी फेडरेशन यांनी दाखवलेली उत्सुकता यामुळे आजपासून तालुक्यातील दोन्ही प्रमुख शहरात कडकडीत बंद पाळला जात असून सर्व व्यवहार ठप्प आहेत.                  कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20 झाली असून त्यातील दोन रुग्ण मयत झाले आहेत,तर तीन रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. असे असताना तालुक्यात आज 15 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यामुळे गेली काही दिवस सातत्याने बाहेरून येणारे लोक यांना होम कोरोन्टाइन किंवा प्रशासनाकडून कोरोन्टाइन केले जात आहे.असे असताना देखील सध्या कर्जत तालुक्यात जे 15 रुग्ण आहेत,त्यातील 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे बाहेरून आलेले किंवा बाहेर जा ये करणारे आहेत.तर चार रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आले आहेत.अशाप्रकारे तालुक्यात तब्बल 15 रुग्णांवर सुरू असलेले उपचार लक्षात घेता आणखी मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणू यांचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.कर्जत शहरात कोरोना पॉझिटिव्ह नऊ तर नेरळ मध्ये एक आणि माथेरान मध्ये दोन आणि ओलमण,तमनाथ येथील एक रुग्णांची संख्या लक्षात घेता सर्व भाग निर्जंतुक करण्यात आला आहे तर कर्जत शहरात सर्व भागात नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.


 


             हे सर्व करून देखील कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या बाहेरच्या तालुक्यातील लोकांचा तांडा थांबवण्यासाठी कर्जत दहिवली येथील बाजारपेठ आणि नेरळ येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन कर्जत नगरपरिषद आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी त्या त्या शहरांतील व्यापाऱ्यांना केले होते.कर्जत नगरपरिषदेच्या आवाहनानंतर कर्जत दहिवली व्यापारी फेडरेशनने तात्काळ होकार दिला असून 28 मे पासून 30 मे पर्यंत कर्जत शहरातील बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे,फक्त मेडिकल सुविधा यांना त्यातून सूट असणार आहे.दुसरीकडे नेरळ ग्रामपंचायतने देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 28 मे ते 30 मे या कालावधीत बाजारपेठ बंद ठेवून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.यापूर्वी 21 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत देखील कर्जत तालुक्यातील कर्जत,नेरळ या बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या,तर कडाव, कशेळे,कळंब येथील बाजारपेठ 31 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या.तर 17 मार्च पासून माथेरान ची बाजारपेठ आणि पर्यटन स्थळ बंद आहे.