कर्जत अपडेटच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.. 144 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्जत अपडेटच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

144 रक्तदात्यांनी केले रक्तदान

कर्जत,ता.3 गणेश पवार

                      कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डिकसळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 144 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

                       कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर आयोजित केले होते.6 एप्रिल 2020 रोजी नेरळ येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते आणि त्यात 155 रक्तदात्यांनी रक्तदान करून यशस्वी केले होते.आज 3 मे कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून डिकसळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डिकसळ येथे रक्तदान शिबिर ग्रामस्थ मंडळ डिकसळ आणि उमरोली तसेच श्रीपती बाबा मित्र मंडळ,पोलीस मित्र संघटना,कर्जत मेडिकल असोसिएशन आणि सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या सहकार्याने साईकृपा हॉटेल येथे आयोजित केले होते.कर्जत अपडेट ग्रुपचे

कर्जत अपडेट ग्रुपचे सागर शेळके,किशोर गायकवाड, अविनाश भासे,शिवाजी कराळे,ज्ञानेश्वर साळोखे,सुप्रेश साळोखे,उत्तम गायकवाड, सचिन गायकवाड,हेमंत कोंडीलकर,पंकज बुंधाटे, शिवसेवक गुप्ता,आतिष हातनोलकर,तसेच जीवक गायकवाड,गणेश पवार,दीपक पाटील,अजय गायकवाड,प्रथमेश कर्णिक, संतोष भासे,गणेश पुरवंत, प्रेरणा गायकवाड, अक्षता गायकवाड यांच्यामुळे यशस्वी झाले.

                      मुंबई येथील राज्य शासनाच्या मुंबई रेडक्रॉस सोसायटी यांच्या माध्यमातून रक्त संक्रमण करण्यात आले.शिबिराचे उदघाटन नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांचे हस्ते फीत कापून आणि उमरोली ग्रामपंचायतचे सदस्य भारती पाटील यांनी श्रीफळ वाढवून केले.त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य संध्या पाटील,प्रचिती गायकर,अजय घारे,तेजस भासे,भास्कर लोंगले,उत्पल जाधव,पोलीस पाटील सरिता शेळके,कर्जत मेडिकल असोसिएशनचे डॉ संजीव पाटील,कर्जत तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष शंकर भुसारी,पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे,यांच्या उपस्थितीत झाले.शिबीर सुरू असताना संतोष कराळे,कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे,जेष्ठ कार्यकर्ते संजय कराळे,माजी उपसरपंच देविदास सावंत,तंटा मुक्त अध्यक्ष लहू श्रीखंडे,भरत कांबरी,व्याख्याते विजय कोंडीलकर,श्रीपती बाबा मंडळाचे विनोद लोंगले,कुस्ती संघटना कर्जत तालुका अध्यक्ष भगवान धुळे,नेरळ व्यापारी फेडरेशन माजी अध्यक्ष अरविंद कटारिया,डिक्सल गावातील जेष्ठ कार्यकर्ते रजत म्हसे,संतोष गायकर,अरुण जाधव,राजेश गायकर, आदींसह अनेक पदाधिकारी यांनी भेट दिली,त्या सर्वांना कर्जत अपडेट कडून तुळशीचे रोप भेट दिले जात होते.

                      शिबिरात रक्त संक्रमण करण्याचे काम मुंबई येथील मुंबई रेड क्रॉस सोसायटीच्या पथकाने केले.त्यात डॉ वजरेकर, आरोग्यसेवक सुशीलकुमार हिवाळे,तसेच लता झाडे,रंजित कदम,वैशाली जांभळे,दीपक महापती,जयराम पंडित,संजय जामदार,त्रिवेणी पटन्स,विद्या महाबळे,कृष्णा डावरे यांनी रक्त संक्रमण करून घेतले.