पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी  विभागात कोरोना बाधित 3 हजार 242 रुग्ण                                               -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह  न्युज पोर्टल


 


पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
विभागात कोरोना बाधित 3 हजार 242 रुग्ण
                                              -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
  
    पुणे दि.10 :- पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 242  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 51 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण  168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 104 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 830  बाधीत रुग्ण असून  938  कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण  151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  96  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
  सातारा जिल्हयातील  119  कोरोना बाधीत रुग्ण असून  20  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  97 आहे. कोरोनाबाधित एकूण  2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील  238  कोरोना बाधीत रुग्ण असून  29  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  196 आहे. कोरोनाबाधित एकूण  13  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील  37 कोरोना बाधीत रुग्ण असून  27  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  9 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील  18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 आजपर्यत विभागामध्ये एकुण 32  हजार 498  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 30 हजार 809 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 689  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  27  हजार  508  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  3   हजार 242   चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.  
आजपर्यंत विभागामधील  90 लाख 80 हजार 526 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 92 लाख 20 हजार 147  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 167   व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. 
                                 0000


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या