महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी*


 पुणे दि.13:- कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली.  तसेच आरोग्य विभागाच्या अधीकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, डॉ. संगीता तिरुमणी तसेच महापालिकेच्या संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
   कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी नियुक्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सुविधेतील कर्मचा-यांची त्यांनी यावेळी माहिती घेतली, तसेच रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, विलगीकरण कक्ष व अन्य विविध कक्षांची पाहणी केली. त्याचबरोबर कोविड 19 च्या उपचारासाठी आवश्यक असणा-या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी रुग्णालयाला आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करुन द्यावी, असे सांगून तेथे करण्यात येणाऱ्या  सुविधांबाबतही श्री. हर्डीकर यांना सूचना  केल्या. 


या रुग्णालयामध्ये 120 खाटांची क्षमता असून  अतीदक्षता विभागात 50 खाटांची सोय करण्यात आली असून 6 व्हेंटीलेटर्स राहणार आहेत, अशी माहिती श्री. हर्डीकर यांनी दिली.‍ 
00000