साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


काम माझं मी निस्वार्थ करीत आहे,
प्रत्येक  बातमीत अर्थ आहे ,
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


ना ऊन , ना वारा, ना पाऊस पाहत आहे
उपाशी ,तपाशी सर्व दूर फिरत आहे 
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


प्रत्येक बातमी तुमच्या पर्यंत वेळेर पोचवत आहे
कुणाचा राग कुणाचा द्वेष पचवत आहे 
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


ना आजार ना व्हायरस पाहत आहे...
रोज प्रशासनाच्या सूचना तुमच्या पर्यंत पोचवत आहे
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


बातमी घेतांना कधी कधी  रोष घेत आहे
तरी वाईट न मानता , मी काम पुढे नेत आहे 
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


ना मला कुठून काही मदत ना कुठून काही आशा
 तरी मी कोरोनाशी लढत आहे हीच माझी आहे नशा 
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


झाला माझ्या पत्रकारांना सुद्धा कोरोना , 
तरी मी तुम्हाला वेळेवर बातम्या देत आहे
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..


गरजू, गरजवंतांना माझ्या परीने मदत करीत आहे 
तरी पत्रकार काहीच करत नाहीत हि ओरड आहे *साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️