आणि कवितेतून जपली सामाजिक बांधिलकी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Respected sir / Madam,


Press Release 



*...आणि कवितेतून जपली सामाजिक बांधिलकी*



कोरोना व्हायरस कोव्हीड - ९ या आजाराने जगभर थैमान घातले असून या निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुण्यातील प्रसिद्ध बासरी वादक व जे उत्तम गीतकार आहेत असे  "अमितवेणू" यांनी
आता पर्यंत त्यांच्या बासरीच्या मधुर स्वरांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला असून रसिकांना त्यांनी त्यांच्या बासरी वादनाने मंत्रमुग्ध केले आहे. सध्या उद्भवलेल्या  गंभीर परिस्थितीवर आणि विषण्ण वातावरणावर अत्यंत सकारात्मक अशी कविता त्यांनी लिहली असून ही कविता प्रत्येकाला प्रेरणा व जगण्याची नवी संजीवनी देणारी आहे. कवितेचे नाव "मी जिवाणू" असे आहे.


मी जीवाणू ...


या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


प्रत्येक माणसात राम समजून
सेवा करण्याचा ध्यास घेतलेल्या
या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


नसेल घेता आली उडी सूर्याकडे
केवळ आवडला म्हणून
पण हनुमंताच्या चरणी 
नतमस्तक होऊन घाम गाळणाऱ्या
या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


बाबा आबांचं बोट धरून
शाळा शिकलेल्या
आई आजीने मायेने भरवलेल्या 
प्रत्येक घासागणिक 
मोठ्ठं व्हायचं स्वप्न पाहिलेल्या
या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


नसेल हे शरीर वीर योद्धा किंवा योगी
नसेल जमलं अजून
स्वतामधले षड्रिपु काढायला
पण कृष्णाच्या बासरीने
तल्लीन होणाऱ्या
या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


नुसतं जगत नाही आम्ही
शिवरायांचे उपकार फेडायचेत अजून
नुसतं मरणारही नाही
संभाजीराजांचे श्वास फेडायचेत अजून
रोज सह्याद्रीला प्रणाम करून
जमिनीवर पाऊल ठेवणाऱ्या
या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


नेताजी, मुरारबाजी, तानाजींना
मनाच्या पालखीतून फिरवणाऱ्या
बाजीप्रभूंची आर्त आरोळी 
रोज श्वासात घेऊन मिरवणाऱ्या
या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


स्वराज्यात शेकडो पचवले
तुझ्या सारखाही पाहून घेऊ
जगण्याचे सगळे नियम पाळून
तुझ्या छाताडावर उभे राहू
तू विषाणू तर आम्ही जीवाणू
तू महाविषाणू तर आम्ही महाजीवाणू


भगवा ध्वज देव्हाऱ्यात ठेऊन
गड किल्ले कपाळावर घेऊन
शिवरायांची पूजा करत
दुसऱ्यासाठी जगण्याची जिद्द
इथे प्रत्येक श्वासात असताना
या श्वासावरती राज्य करणं
एवढं सोपं वाटलं का तुला ?


कवी - अमितवेणू