लाईट शो जोरात झाला पाहिजे. बाकी खालील प्रश्न अजिबात विचारायचे नाही. .....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मित्रों..


घरात मेणबत्ती,टॉर्च आहे का शोधा, ५ तारखेला संध्याकाळी मोबाईल फुलं रिचार्ज करा.९ मिनिट लाईट दाखवायचा आहे. लाईट शो जोरात झाला पाहिजे. बाकी खालील प्रश्न अजिबात विचारायचे नाही. 


१. किती लोकं उपाशी आहेत, किती आजुन इच्छित स्थळी पोहचायचे आहेत ? 
२. देश कोरोना नियंत्रणात आणत आहे का ?
३. मेडिकल फॅसिलिटीज्, मेडिकल इंस्फरास्ट्रक्चर या बाबत काय ? पुरेसे आहे का ? 
४. खासगी डॉक्टर्स ना पुरेसे मेडिकल किट कधी देणार ?
५. लॉकडाऊन वाढत गेले तर जीवनावश्यक वस्तुसाठी देखील बाहेर जायला नको त्याकरता महानगरपालिका, नगरपालिका, गाव प्रशासनाकडून घरपोच वस्तू पोहोच होतील अशा सुविधा सरकार हळू हळू डेवलप करेल का ?
६. मरकज सारख्या भयानक गोष्टीबद्दल पंतप्रधान काही का बोलले नाहीत ? पुढे अशा भंपक कृत्यांना आळा कसा घालणार आहेत ? 
७. मुस्लिम, हिंदु अगर कोणीही असो आता धार्मिक स्थळ, धार्मिक कार्यक्रम, उत्सव खपवून घेतले जाणार नाहीत या बद्दल प्रबोधन का केले नाही ? 
८. स्वपक्षीय मुख्यमंत्री योगी आदित्य यांनी गुढी पाडव्याला संचारबंदी मोडून, सोशल डिस्टनसींग बाजूला सारून जमावाला घेऊन राम मूर्तीचे पूजन मंदिरात कसे केले ? 
९.महाराष्ट्र पोलिसांनी मरकज ला परवानगी नाकारली होती मग दिल्ली पोलिस जे पर्यायाने केंद्रीय गृमंत्रालयाच्या अखत्यारित येतात त्यांनी कानाडोळा का केला ? 
आणि हो
१०. मेणबत्ती आणायला आता किती बाहेर पडतील ? 


का कुणास ठाऊक पण उध्दव ठाकरे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून जसे आश्वासक, विधायक, मॅन विथ मिशन आणि आपलेसे वाटतात तसे मोदी साहेब का वाटत नाहीत ?


उपयोगशून्य टाळ्या/ थाळी वाजवणे आणि आता मेणबत्ती/टॉर्च/ मोबाईल लाईट पेटवणे असे इव्हेंट मोदी साहेब का करत बसतात ??


असे प्रश्न तुम्हाला अजिबात पडता कामा नये. देश महासत्ता बनवायचा असेल तर ते जे बोलतात ते ऐका कारण प्रत्यक्ष देवाने अवतार घेतला आहे. देवाला कोण प्रश्न विचारतं का ?