जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून भारती हॉस्‍पीटलच्‍या चमूचे कौतुक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून भारती हॉस्‍पीटलच्‍या चमूचे कौतुक


            पुणे, दिनांक 31- जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडीकल स्‍टाफ यांच्‍या समर्पित भावनेने व सेवेने कोरोनाबाधित रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाणही लक्षणीय आहे. येथील भारती हॉस्‍पीटलमध्‍ये गेल्‍या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित महिलेवर उपचार चालू होते. तिची तब्येत अतिशय गंभीर होती. ती व्‍हेंटीलेटरवर होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्याने तिच्‍या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून  व्‍हेंटीलेटरवरुन काढून आयसीयूमध्‍ये तिला शिफ्ट  करण्‍यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण योग्य उपचाराने बरे होत आहेत, ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब आहे. वैद्यकीय अधिकारी तसेच इतर परिचारिकांनी कोरोना बाधित रुग्णांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनीही हॉस्‍पीटलचे अधिष्‍ठाता डॉ. संजय ललवाणी आणि त्‍यांच्‍या चमूचे कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले आहे.


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
तुम्ही जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो. डॉ. राजन माकणीकर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image