सोसायट्यांतील असंघटित कामगारांची माहिती पाठवा* ......................

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Press note


*सोसायट्यांतील असंघटित कामगारांची माहिती पाठवा*
......................
गृहनिर्माण महासंघाचे आवाहन


पुणे :


कोरोना  लॉकडाऊन पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील असंघटित कामगारांची माहिती श्रम मंत्रालय व जिल्हा उपनिबंधकांनी मागविली असल्याचे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


स्वयंपाक, स्वच्छता, झाडण काम करणारे, ड्रायव्हर या कामगारांना 'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन 'या पेन्शन योजनेमधून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.


तरी गृहनिर्माण सोसायट्यांमधील व घरातील अशा कामगारांची माहिती ई-मेलवर ४ एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आवाहन त्यांनी सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांना केले आहे.


ई-मेल पुढीलप्रमाणे आहेत :


dculo-mah@gov.in
bulk.domestic@gmail.com


ddrcspune@gmail.com


punefed@gmail.com


 दरम्यान, गृहनिर्माण संस्थांनी आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक सहाय्य करावे, असेही आवाहन पटवर्धन यांनी केले आहे.


लॉकडाऊनमुळे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे कार्यालय व सहकार दरबार  उपक्रम १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे ही माहिती ईमेल वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


................................................