तुमची गॅस सबसिडी खात्यात जमा झाली का? 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


तुमची गॅस सबसिडी खात्यात जमा झाली का?
___________________________________


गॅस सिलेंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याला ठरवल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून घरगुती सिलेंडरच्या दरांत वाढ होताना पाहायला मिळतेय. त्यामुळे सरकारकडून घरगुती गॅस धारकांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने LPG गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी दुप्पट केली आहे. पेट्रोलिअम मंत्रालयानुसार, दिल्लीत आतापर्यंत 14.2 किलोच्या सिलेंडरवर 153.86 रुपयांची सबसिडी मिळत होती. जी आता वाढवून 291.48 करण्यात आली आहे.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनवर 174.86 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी मिळत होती. ती वाढवून आता 312.48 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली आहे. 


इंडियन ऑईलनुसार, दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 144.50 रुपयांनी वाढवून 858.50 रुपये झाली आहे. LPG सिलेंडरवर अनेकांना सबसिडी मिळते. डायरेक्ट कॅश ट्रान्सफर स्किमनुसार, ग्राहकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले जातात.
घरीच तपासा सबसिडी जमा झाली की नाही -
गॅस सबसिडी कोणत्या तरी दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात नियमित सबसिडी जमा होते की नाही हे तपासणं गरजेचं आहे. त्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. 


घरबसल्या मोबाईलद्वारे याची माहिती घेता येऊ शकते -


- सर्वात आधी Mylpg.in वेबसाईटवर जा


- वेबसाईटच्या होम पेजवर तीन एलपीजी सिलेंडर कंपन्यांचा फोटोसह टॅब असेल


- आपल्या सिलेंडरची कंपनी सिलेक्ट करा


- त्या कंपनीच्या सिलेंडर टॅबवर क्लिक करा


- सब्सिडी आली की नाही तपासण्यासाठी एक नवं पेज ओपन होईल


- ‘Give your feedback online’ वर क्लिक करा


- आपला मोबाईल नंबर, LPG कंज्यूमर आयडी, राज्याचं नाव, डिस्ट्रीब्यूटरची माहिती भरा


- त्यानंतर  ‘Feedback Type’वर क्लिक करा


- ‘Complaint’ पर्याय निवडून ‘Next’वर क्लिक करा


- नव्या पेजवर ग्राहकाचे बँक डिटेल्स समोर असतील. डिटेल्सवरुन सबसिडीची रक्कम खात्यात आली की नाही त्याबाबत माहिती मिळेल.


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image
कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image