कोरोना विषाणूच्या या संकट काळात माहिती व उपाययोजनानबाबत  अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व प्रसार माध्यमातील पत्रकारांना ५० लाखाचा विमा कवच व अर्थ सहाय्य देणे बाबत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


दि.०९/०४/२०२०


प्रति,
 मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे,
 मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य,
 मंत्रालय, मुंबई ३२.


विषय :  कोरोना विषाणूच्या या संकट काळात माहिती व उपाययोजनानबाबत  अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व प्रसार माध्यमातील पत्रकारांना ५० लाखाचा विमा कवच व अर्थ सहाय्य देणे बाबत.....



 सन्माननीय मुख्यमंत्री  महोदय ,
             उपरोक्त संदर्भीय विषयांकित कोरोना महामारी विषाणू मुळे भारत देशातील सर्व राज्यामध्ये सांसर्गिक विषाणूंची नागरिकांना मोठ्या प्रमाणात बाधित (लागण) होऊन अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
         सबब कोरोना विषाणू बाबत रूग्ण संख्येमध्ये होणारी सततची वाढ आणि त्यावरती अध्यापर्यंत थेट कोणताही संरक्षणानात्मक औषध उपचार उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये युद्धजन्य संकट निर्माण झालेले असून अशा अडचणी प्रसंगी  राज्यातील विविध प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकार,बातमीदारांना ५० लाख रु चा सुरक्षा कवच तसेच या संकटाच्या घडीला आर्थिक सहाय्य करणे आवश्यक असून सद्यस्थितीत अनेक प्रसार माध्यमांतील मोठ्या अस्थापनां व्यतिरिक्त इतर लहान मोठ्या अस्थापनांमध्ये पत्रकारां काम करतात त्यांना तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या पत्रकारांना कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाहीत तरी राज्याच्या आणि समाजाच्या हितासाठी सतत धडपडणाऱ्या या पत्रकारांसाठी वरील प्रमाणे तजबीज करणे ही आपली जवाबदारी आहे. तरी  म्हणून सदरचे निवेदन आपणास सविनय सादर..... 
कळावे !



आपला विनीत, 



सुशांत अशोक भिसे
अध्यक्ष,सामर्थ्य प्रबोधिनी,पुणे.
अ ३०१ नमो दत्त विहार 
दांगट पाटील नगर 
शिवणे पुणे ४११०२३.