पालघर घटनेचा तपास सीआयडीकडे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पालघर घटनेचा तपास सीआयडीकडे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
__________________________________


कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. आतापर्यंत ४४८३ कोरोनाबाधित रूग्ण राज्यात सापडले आहेत. असं असताना २० एप्रिल रोजी काही प्रमाणात शिथिलता निर्माण करण्यात आली. मात्र आता बंधन नसल्यासारखे लोक वागत आहेत. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. 
पालघरसारखी घटना पुन्हा होऊ नये अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सरकार या प्रकरणावर शांत बसलेलं नाही. पालघर प्रकरणी मॉब लिचिंगचा प्रकार निंदनीय आहे. या घटने प्रकरणी पाच महत्वाच्या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. कुणीही या प्रकरणात धार्मिक कारण शोधू नये. अमित शाह,योगी आदित्यनाथांशी पालघर तिहेरी हत्याकांडाबाबत चर्चा झाली आहे. 
गुन्हेगाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. ५ प्रमुख आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच १०० हून अधिक लोकांना देखीत ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण दादरा नगर हवेली येथे घडली आहे. दुर्गम परिसरात हे हत्याकांड घटलं आहे. पालघर प्रकरणात मॉब लिचिंगच प्रकरण अतिशय निंदनीय आहे. 


पालघर प्रकरण आता सीआयडीकडे देण्यात आलं आहे. या प्रकरणाची कसून चौकशी होणार असून दोन पोलिसांना निलंबित केलं असून आनंदराव काळे, सुधीर काटारे अशी त्यांची नावे आहेत. 
हा दोन धर्मांतला संघर्ष नाही त्यामुळे सरकारवर आरोप करण चुकीचं  आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. सरकार शांत बसलेलं नाही. त्यामुळे कुणीही या प्रकरणात आग लावू नका. ही घटना फक्त गैरसमजातून झाली आहे. पण कुणालाही याबाबत सोडणार नाही.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली