लाँकडाऊन:-शहर वाहतूक पोलिसांनी केली नाकाबंदित वाहनांवर कारवाई...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


लाँकडाऊन:-शहर वाहतूक पोलिसांनी केली नाकाबंदित वाहनांवर कारवाई...
-------------------------------------
नागपूर :-दि.२०ए.(सविता कुलकर्णी):- नागपूर शहर,पोलिस आयुक्तालय अंतर्गत सर्व प्रमुख रस्त्यांवर, सर्व चौकांवर नाकाबंदी लावण्यात आली असून शहरात सतत पोलीस पेट्रोलिंग वर आहे. जनमाणसांना त्यांच्या सुरक्षेसाठी घराबाहेर न निघण्याबाबत प्रसार माध्मम, सोशल मिडिया, पोलिस वाहनावरिल पी.ए. सिस्टम द्वारे आणि प्रत्यक्ष, सतत माहिती देवून कळविण्यात आले आहे आणि येत आहे


      कोरोना विषाणू(कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लाँकडाऊन आदेश नियमित करण्यात आले आहे. आणि नमूद आदेशाची सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे.


       वरिल आदेशाचे अवहेलना करणारे विरूद्ध नागपूर शहर पोलिस विभाग सतत कारवाई करित आहे. दिनांक 20.04.2020 रोजी केलेल्या कारवाईची मागणी खालिल प्रमाणे आहे.
१) वरिल आदेशाचे उल्लंघन करणारे विरुद्ध कलम १८८ भादवी अंतर्गत ४३ कारवाई
२) विनाकारण वावरणारे विरुद्ध कलम ६८,६९ म.पो.का. अन्वये ३८ कारवाई
३)  दुचाकी/चारचाकी वाहन चालकाविरुद्ध लाँकडाऊन दरम्यान मोटार वाहन कायदा अन्वये ९५३ कारवाई
४) लाँकडाऊन दरम्यान क. २६९,२७० भादवी ११ कारवाई
अशी एकूण १०४५  प्रतिबंधात्मक कारवाई दिनांक 20.04.2020 रोजी करण्यात आलेली आहे. आणि सदरची कारवाई नियमित सुरु राहणार आहे. करिता जनमाणसांना आव्हान ही करण्यात आले आहे की, त्यांनी लाँकडाऊन संदर्भात नियमित सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आव्हान देखिल वाहतूक पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.


 


 


.


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image