अन्नपूर्णा शब्दाचा अर्थ समजून घेताना,  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*🌺*अन्नपूर्णा*🌺
   अन्नपूर्णा शब्दाचा अर्थ समजून घेताना, पाककौशल्य, खाद्यसंस्कृतीची जाण, दानत, आत्मीयता, अशा सर्व गुणांचा मेळ गृहित असतो. सद्यःस्थितीत, अशाच एका अन्नपूर्णेची ओळख, सर्वांना करून देत आहोत. 
    *रेखाताई देशपांडे* मध्यमवर्गीय गृहिणी ,पतीच्या पश्चात, तीन कन्यांसह, प्रपंचाचा गाडा समर्थपणे पेलताना, खाद्यपदार्थ, जेवणावळींच्या कंत्राटी व्यवसायात, स्वतःचे स्थान निर्माण केले. वृद्ध, अनाथांच्या संस्थांशी निकटचे संबंध  ! त्यातूनच त्यांना सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि वयोवृद्ध, अपंगांना, विनामूल्य घरपोच भोजनसेवा सुरू केली. पंचवीस मार्चला  सुरवात केलेल्या या सेवेचा, आता 116 ज्येष्ठ दैनंदिन लाभ घेत आहेत. 
   रेखाताईंची कन्या, या सेवेचे व्यवस्थापन करते आहे. Work from home सांभाळून  तिला आता सातआठ युवकांची साथ मिळते आहे. सकल जैन महासंघ,जीतो आणि अलायन्स क्लब यांनी धान्य पुरवठ्या साठी सहभाग घेतला आहे. 
*महत्वाची बाब म्हणजे, मे महिन्यात कन्येच्या विवाहाची तारीख असूनही*, रेखाताईंनी अन्नदानाचे हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी, निश्चयपूर्वक स्वीकारली आहे. 
संकटे येतात जातात आणि अग्नीदीव्य पार पाडणारी माणसे, या निमित्ताने झळाळून निघतात. 
    या अन्नपूर्णेला, समाजाची कृतज्ञतापूर्ण साथ, निश्चितच मोलाची ठरणार आहे. 
   आनंद सराफ