*अब सुख आयोरे* . . .
🌸🌸🤝🌸🌸
गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, विधायक विचाराने आणि नेमक्या दिशेने कार्यरत झाले तर काय ऊंचीचे आणि विश्वविख्यात कार्य उभे राहू शकते, याचे अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे रस्त्यावरील वयोवृद्ध गायक केशवलाल वाघरी यांचे नाव घेता येईल.
आठ वर्षांपूर्वी केशवलाल, त्यांची पत्नी आंणि विधवा सुनेसह पुण्यात आले तेव्हा मनपाच्या पुलाखाली आणि नंतर शिवाजीनगर कोर्टाबाहेर, फुटपाथवरच रहात होते. मध्यवस्तीत रात्रीचे वेळी भ्रमंतीकरताना जुन्या हिंदी गाण्याचे सूर कानी पडले तेव्हा माणूस समजून घेताना, या कलाकाराने, कधीकाळी, नागीन चित्रपटात, महेंद्रकपूर यांच्या वाद्यवृंदात साथ केल्याचे समजले. पुण्यनगरीमधे कलाकाराची अशी विपन्नावस्था ,मनाला खटकणारी होती.
गणपती मंडळाच्या आम्ही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, या बेघर कलावंताला स्वतःचे घर मिळवून देण्याचा निश्चय केला.
हीराबाग मंडळाच्या गणेश मंदीरासमोरच, माध्यमांना आमंत्रित करून, केशवलाल यांच्या हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम योजला आणि मंडळांच्या साथीने, संगीतरसीकांनी,भरभरून प्रतिसाद देण्यास सुरवात झाली.
यथावकाश, सव्वा लाखाहून अधिक निधी उभारून, शासनाच्या अल्प उत्पन्न योजनेतून, या कलाकाराचे, वारजे भागात, स्वतःचे घर उभे राहिले. गृहप्रवेशावेळी ,केशवलाल यांनी आवर्जून, मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला होता.
सद्भावनेचा हा प्रवास इथेच न थांबता, विश्वव्यापी झाला. केशवलाल यांच्या जीवनप्रवासावर,FTI च्या विद्यार्थ्यांने Bohemian musician या नावे short film तयार केली. जगभरातील सर्व देशांत, या चित्रपटाचे प्रदर्शन होऊन, त्याला आता पन्नास पेक्षा अधिक पारितोषिके प्राप्त आहेत.केशवलाल यांची जीवनकथा, नामवंत चॅनल्सवर सुद्धा प्रदर्शित झाली. हे श्रेय अर्थातच विधायक वृत्तीच्या सर्वांचेच आहे.
पदपथावरील निवासी कलाकाराने, नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंदाने वाजवलेले ते गीत, आजही आमच्या स्मरणात आहे . .
*दुखभरे दिन बितेरे भैय्या* . . *अब सुख आयोरे*,
*रंग जीवनमे नया, लायोरे*. . .
मंगलमूर्ती मोरया !
*आनंद सराफ*
सहभागी प्रातिनिधिक कार्यकर्ते,
दिलीप राऊत, शिरीष मोहिते, पराग ठाकूर, दत्ता सागरे, जितेंद्र भुरूक, भारत देसडला,रोचक साहू आणि अज्ञात सहकारी